Ram Satpute visit to Sinapatty Interaction with office bearers and workers lok sabha election 2024  Sakal
सोलापूर

Ram Satpute : राम सातपुते यांचा सीनापट्ट्यात दौरा; विविध गावांना भेटी देऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद

भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना पट्ट्यातील गावांना भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

उ. सोलापूर : भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना पट्ट्यातील गावांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते मनीष देशमुख होते. यावेळी त्यांनी या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गुरुवारी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव, तेलगाव, पाथरी, तिऱ्हे, शिवणी व पाकणी या गावांना भेटी दिल्या. तिऱ्हे येथील भेटीत बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले, मागील दहा वर्षांमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकासकामे केली आहेत.

जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी यांनी भारताचे नाव उंचावले. विकासाच्या मुद्द्यावर व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मला साथ द्या, असे त्यांनी आव्हान केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते मनीष देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले.

पाकणी येथे झालेल्या भेटीप्रसंगी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सुनील गुंड यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात आमदार सुभाष देशमुख यांच्या सहकार्याने गावात केलेल्या विकासकामांची माहिती सातपुते यांना दिली.

सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राम जाधव, माजी तालुकाप्रमुख मुरारी शिंदे, माजी सरपंच शोभा गुंड, रेखा हजारे, मीनाक्षी खांडेकर, हिरजचे माजी सरपंच नंदकुमार पवार, शिवाजी यादव, लक्ष्मण खांडेकर,

अब्दुल मुलानी, सुषमा गयाळे, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया कुंभारे, हरिभाऊ पाटील, संदीप चटके, नंदकुमार गुंड, धनाजी पाटील, प्रकाश गुंड, दिनेश वाले, संजय शिंदे, हरीदास माने, प्रकाश गुंड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT