pandharpur Esakal
सोलापूर

पंढरपुरातील पाच गावातील निर्बंध शिथिल

या गावांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पाच गावांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : तालुक्‍यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्‍यातील पाच गावांमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन केले. या गावांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पाच गावांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

तालुक्‍यातील ग्रामीण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गांव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्‍यातील 28 गावांमध्ये कडक निर्बंध जाहीर करण्यात आले होते. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्याने तालुक्‍यातील सुपली, पटवर्धन कुरोली, भोसे, लोणारवाडी व गादेगांव या गावांमध्ये पाचपेक्षा कमी रुग्ण बाधित असल्याने निर्बंध शिथिल केले असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

निर्बंध शिथिल करण्यापूर्वी तालुक्‍यातील सुपली येथे 12, पटवर्धन कुरोली 31, भोसे 29, लोणारवाडी 13 तसेच गादेगाव येथे 31 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. या पाचही गावांतील नागरिकांची कोरोना चाचणी, वेळेत उपचार तसेच प्रशासनाने केलेल्या आवश्‍यक उपाययोजना व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केल्याने गावांतील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. तालुक्‍यातील कडक निर्बंध असलेल्या इतर गावांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन करावे व आपले गांव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री. गुरव यांनी केले.

दरम्यान, तालुक्‍यातील बोहाळी गावांमध्ये 10 पेक्षा अधिक रुग्ण संख्या वाढल्याने 2 सप्टेबर 2021 पासून या गावांमध्ये पुढील 14 दिवस कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT