सोलापूर

सोलापुरातील `या` शाळेत मिळेल आरटीईनुसार ऑनलाइन प्रवेश

विजयकुमार सोनवणे


 
सोलापूर  :  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी (राईट टू एज्युकेशन - आरटीई) शहरातील 21 शाळा पात्र झाल्या आहेत. या शाळांमध्ये नर्सरी व एलकेजीसाठी 43 तर पहिलीसाठी 342 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी उद्यापासून (बुधवार) सुरू होत आहे. इच्छुकांनी कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी केले आहे. 

ऑनलाइन प्रक्रियेत 25 टक्के प्रवेश
ऑनलाइन प्रक्रियेत 25 टक्के प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी अधिक माहितीसाठी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असून, त्यासाठी rte25admission.maharashtra.gov.in किंवा https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावरून अधिक माहिती घ्यावी, असे श्री. शेख यांनी सांगितले. 

प्रवेशासाठी पात्र शाळा याप्रमाणे 
राज मेमोरिअल इंग्लिश मीडियम स्कूल, केकडेनगर, नागेश करजगी ऑर्किड स्कूल, राज मेमोरिअल स्कूल, जुनी मिल कंपाउंड, गांधीनाथा रंगजी इंग्लिश मीडियम स्कूल, सहस्त्रार्जुन इंग्लिश मीडियम स्कूल, व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, पोलिस पब्लिक स्कूल, सुरवसे इंग्लिश मीडियम स्कूल, श्री सुशीलकुमार शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, इंडियन मॉडेल स्कूल, जुळे सोलापूर, मॉडेल पब्लिक स्कूल, इंडियन मॉडेल स्कूल सीबीएसई, युनिक इंग्लिश मीडियम स्कूल, बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल, पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश मीडियम स्कूल, गुडशेफर्ड प्रायमरी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि एस. ए. ए. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Wagholi Crime : दागिने चोरी करणारी आंतरराज्यीय महिला टोळी जेरबंद; मध्यप्रदेश मधील सहा महिलांचा समावेश

SCROLL FOR NEXT