In Sangola he has been beaten up for asking for rent 
सोलापूर

भाडेकरूने केली एक फ्लॅट अन्‌ वीस लाखांची मागणी

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : थकित असलेले घरभाडे मागितल्याचा राग मनात धरून घरमालकास बोलावून घेऊन घर भाड्यासाठी माझ्या पत्नीला फोन का करतोस? तुझ्यावर गुन्हा करतो, पोलिसात आमची खूप ओळख आहे. असे म्हणून भाडेकरू व त्याच्या साथीदारांनी लाकडी दांड्याने मारहाण करून हे प्रकरण मिटवायचे असेल तर अपार्टमेंटमधील एक फ्लॅट नावावर करून द्या किंवा वीस लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याची तक्रार घर मालकाने केली आहे. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सांगोला येथे घडली आहे. 

याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी शिवाजी पांडुरंग नवले (रा. एखतपूर, ता. सांगोला) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे एखतपूर रोडला मस्के कॉलनीसमोर अष्टविनायक अपार्टमेंट आहे. यामध्ये 21 प्लॅट आहेत. या इमारतीमध्ये कडुबा खरात हे भाड्याने राहण्यास होते. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास कडुबा खरात यांना त्यांच्याकडे थकित असलेले घरभाडे मागितल्याचा राग मनात धरून त्यांनी घरमालकास सांगोला मार्केट यार्डसमोर बोलवून घेतले. यावेळी त्याचे साथीदार श्री. ढोबळे, ढावरे व इतर चार अनोळखी व्यक्ती येथे होत्या. ढावरे याने घर भाड्यासाठी माझ्या पत्नीला फोन का करतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, पोलिसात आमची खूप ओळख आहे, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्याच्या बरोबर आलेल्या इतर साथीदारांनीही घरमालकास मारहाण केली. तसेच घरमालक शिवाजी नवले यांचा मोबाईल फोन हिसकावून घेऊन त्यांच्या फोन पे अकाउंटवरून दोन हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर केले. तसेच हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला अष्टविनायक आपारमेंटमध्ये एक फ्लॅट आमच्या नावावर करून द्या किंवा आम्हाला वीस लाख रुपये द्या, असे म्हणाले. नवले यांच्या फोनवरुन त्यांचा मुलगा राजेंद्र यास खरात याने फोन करून तुझ्या वडिलांवर गुन्हा दाखल करणार आहे, तुला हे मिटवायचे असेल तर वीस लाख रुपये घेऊन ये असे सांगितले.

यावेळी फिर्यादीचा मुलगा, भाऊ सुभाष नवले, पुतण्या सुरेश नवले सागर नवले यांनाही शिवीगाळ व दमदाटी करून वीस लाख रुपये द्या किंवा अपार्ट्मेंटमध्ये एक फ्लॅट नावावर करून द्या अशी मागणी केली. यामुळे शिवाजी पांडुरंग नवले यांनी कडुबा खरात (पूर्ण नाव माहित नाही), ढोबळे (पूर्ण नाव माहित नाही), ढावरे (पूर्ण नाव माहित नाही) व त्याच्या सोबत इतर चार अनोळखी व्यक्तींवर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT