सोलापूर

सुभेदार तानाजी मालुसरे यांची कवडीमाळ शुक्रवारी `या`शहरात

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : छत्रपती श्री. शिवाजी महाराजांची जयंती खड्डा तालीमतर्फे यंदा हिंदवी स्वराज्यातील नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या  कवडी माळेचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.14) कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती खड्डा तालीमचे संस्थापक नगरसेवक सुनील कामाटी यांनी दिली. 

उद्या होणार स्थापना 
दरवर्षीप्रमाणे बुधवारी (ता.12) सायंकाळी साडेसात वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भव्य सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणुकीने शासकीय रुग्णालयाच्यामागील पोटफाडी चौकात होणार आहे. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघणार आहे. सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मूर्तीचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

शुक्रवारी शिवमुर्तींचे वाटप 
शुक्रवारी (ता.14) सायंकाळी सहा वाजता हिंदवी स्वराज्यातील नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांच्या हस्ते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तब्बल 60 शिवजन्मोत्सव मंडळांना छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तींचे वाटप फोटफाडी चौकात करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. शीतल मालुसरे यांचे मार्गदर्शन होणार आहे. 

रविवारी शिवदिपोत्सव 
खड्डा तालीम यंदा शिवदीपोत्सवदेखील करणार आहे. खड्डा तालीम परिसरात राहणाऱ्या महिलांच्या हस्ते 51 हजार दिवे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या परिसरात लावण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम पोटफाडी चौकात रविवारी (ता. 16) सायंकाळी सात वाजता होणार आहे. महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis meets Anna Hazare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला; महिनाभरापासून ताप आणि जुलाबाचा त्रास, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT