श्रीगुरु बालाजी तांबे यांनी दिली होती पंढरपूरला भेट  Canva
सोलापूर

श्रीगुरु बालाजी तांबे यांनी दिली होती पंढरपूरला भेट

श्रीगुरु बालाजी तांबे यांनी दिली होती पंढरपूरला भेट

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

श्रीगुरु बालाजी तांबे यांनी दहा वर्षांपूर्वी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले होते.

पंढरपूर (सोलापूर) : श्रीगुरु बालाजी तांबे (Shri Guru Balaji Tambe) यांनी दहा वर्षांपूर्वी पंढरपुरात (Pandharpur, Solapur) येऊन श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले होते. त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार (Abhijit Pawar) हे देखील आवर्जून आले होते. श्रीगुरु बालाजी तांबे आणि श्री. पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर तालुक्‍यातील पटवर्धन कुरोली येथे एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ते पंढरपूर येथे आलेले असताना श्रीगुरु तांबे, त्यांचे कुटुंबीय तसेच श्री. पवार यांनी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात जाऊन मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले होते. त्या वेळी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला होता. विठुरायाचे शांतपणे दर्शन झाल्यामुळे श्रीगुरु तांबे यांनी समाधान व्यक्त केले होते.

श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप, श्री रुक्‍मिणी सभामंडप, बाजीराव पडसाळी अशा मंदिरांच्या सर्व भागांची श्रीगुरु बालाजी तांबे, श्री. पवार यांच्यासह सर्वांनी पाहणी केली होती. त्या वेळी भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी सर्वांना मंदिराच्या बांधकामातील वैशिष्ट्ये आणि पंढरी महात्म्य याविषयी सविस्तर माहिती दिली होती. श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर त्यांनी कुंकू, बुक्का, अष्टगंध, पितळेच्या विविध देवतांच्या मूर्तींची संबंधित विक्रेत्यांसोबत मोठ्या आपुलकीने, जिव्हाळ्याने चौकशी करत खरेदी केली होती.

त्या वेळी सर्वांनी "सकाळ'चे प्रतिनिधी अभय जोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती. त्या वेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते श्रीगुरु बालाजी तांबे, अभिजित पवार यांचा घोंगडी तसेच पंढरपूरची सुप्रसिद्ध उदबत्ती देऊन सत्कार करण्यात आला होता. श्री. परिचारक यांनी आयुर्वेदिक औषधोपचाराविषयी श्रीगुरु बालाजी तांबे यांच्याकडून माहिती जाणून घेतली होती. पटवर्धन कुरोली येथे नदीकाठावर आयोजित खासगी धार्मिक कार्यक्रमात हे सर्वजण सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT