Crime  esakal
सोलापूर

Solapur : ‘ATM’ मधून पैसे लंपास करणारे जेरबंद

हरियानातील तिघे फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : हिताची पेमेंट्‌स सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या एटीएममधून तब्बल १० लाख रुपये लंपास करणाऱ्या तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. हरियानातून चारचाकी घेऊन तिघेजण ऑक्टोबरमध्ये शहरात आले होते. त्यासंदर्भातील गुन्हे आता दाखल झाले. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. एसटी स्टॅंड परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्या तिघांनीच तो प्रकार केल्याची बाब आता पोलिस तपासात समोर आली आहे.

फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अवि लॉजजवळील एटीएममध्ये सात डेबिट कार्ड वापरून त्या तिघांनी एक लाख ९९ हजार रुपये लंपास केले होते. ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांत तेथील एटीएममधून पैसे काढले. तर जुने विडी घरकुल परिसरातील हिरा मोती टॉवर (सोनिया नगर), योगेश्वर नगर (शिंदे शाळेजवळ) व हैदराबाद रोडच्या विरुद्ध दिशेला युनियन एटीएमजवळील हिताची कंपनीच्या एटीएममधून चोरट्यांनी १५ ऑक्टोबर रोजी तब्बल पाच लाख ९९ हजार २०० रुपये लंपास केले. फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केलेले तेच तिघे या गुन्ह्यात संशयित आहेत.

जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका एटीएममधील काही रोकड चोरीला गेल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ते तिघेही पांढऱ्या चारचाकीतून रविवारी (ता. १८) रात्री साडेआठच्या सुमारास संशयितरीत्या फिरत होते. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्यांच्या पथकासह त्या तिघांवर वॉच ठेवला. त्याचवेळी त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकालाही मदतीला बोलावले. त्या सर्वांनी मिळून त्यांना थांबवले व प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, तेव्हा संशय बळावला आणि पहाटे दीडच्या सुमारास त्यांना अटक केली. तिघेही ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

प्रत्येकवेळी दोन महिन्यांचा गॅप

हरियानातून चारचाकी घेऊन शहरात एटीएममधून पैसे लंपास करण्याच्या निमित्ताने तिघेजण आतापर्यंत एका वर्षात तीनदा आले होते. जुलै २०२२ मध्ये येऊन गेल्यावर ते पुन्हा ऑक्टोबरमध्ये शहरात आले होते. प्रत्येकवेळी त्यांनी दोन महिन्याचे अंतर ठेवले होते. ऑक्टोबरमध्ये आल्यानंतर त्यांनीच फौजदार चावडी, एमआयडीसी व जेलरोड पोलिस ठाण्यातील एटीएममधून पैसे लंपास केल्याचा संशय आहे. तिन्ही पोलिस ठाण्याअंतर्गत दाखल फिर्यादीनुसार पैसे लंपास करण्याची पद्धत एकच असल्याने तेही गुन्हे उघडकीस येतील. त्यांच्याकडून चोरीची रक्कम हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

Video Viral: पाकिस्तानी गोलंदाजाने आज मार खाल्लाच असता... फलंदाजाने बॅट उगारली, दोघांनी अडवले नाहीतर घडला असता अनर्थ...

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांची चांदी! ७ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; योगी सरकारकडून पगारवाढीचं मोठं 'गिफ्ट'!

बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

SCROLL FOR NEXT