solapur crime cattle smugglers put tempo on police case registered against three goods worth lakhs seized Esakal
सोलापूर

Solapur Crime News : पोलिसावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

तिघा गोतस्करांनी पोलिस शिपायाच्या अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : तिघा गोतस्करांनी पोलिस शिपायाच्या अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर सरकारी वाहनास धडक दिल्याने त्याचा दरवाजा तुटला. त्यानंतर टेम्पो सोडून त्यांनी पलायन केले. शुक्रवारी (ता. ११) सकाळी ६.४० च्या सुमारास गुरुनानक चौकातील तालुका पोलिस ठाण्याजवळील रद्दी डेपोसमोर ही घटना घडली. पोलिसांनी १६ देशी, पाच जर्सी गोवंश व टेम्पो असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्या तिघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

समीर कय्युम कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, सोलापूर), किरण बनसोडे, बाबू गेजगे (रा. भीम नगर, सांगोला, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल चिदानंद काळजे यांनी टेम्पो (क्र. एम एच ११ एम ४७८९) थांबविण्यासाठी हाताने इशारा केला.

मात्र, चालक समीर याने टेम्पो काळजे यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच टेम्पोने सरकारी वाहन क्रमांक (एम एच १३ टी डी ७१०२) ला पाठीमागील बाजुस धडक दिली. यात वाहनाचे पाठीमागील इंडिकेटर, दरवाजा तुटल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर संशयित टेम्पो तेथेच सोडून पळून गेले. टेम्पोत १६ देशी व पाच जर्सी गोवंश होते. संशयितांनी क्रूरपणे दोरीने बांधले होते. ते कत्तलीसाठी शास्त्रीनगरकडे घेऊन निघाले होते.

गोसंरक्षक संघटनांकडून निषेध

याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गोवंशाच्या वाहतुकीसह जीवे मारण्याचा प्रयत्न करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर तपास करीत आहेत. या घटनेचा गोसंरक्षक संघटनांनी निषेध केला असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT