Solapur Assembly Election Sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : लाडकी लालपरीही निवडणुकीच्या कामावर; प्रवाशांचे हाल

Solapur Vidhan Sabha Election 2024 : साेलापूर जिल्ह्यातील ५९६ पैकी ४६८ बस या निवडणूक कामासाठी गुंतलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून विभागातील ४६८ गाड्या प्रशासनाच्या सेवेत गुंतल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आज कुठेही एसटीने जाण्याचा बेत करत असाल तर एसटीच्या भरवशावर घराबाहेर पडू नका. मंगळवारी दुपारपासूनच जिल्ह्यातील ५९६ पैकी ४६८ बस या निवडणूक कामासाठी गुंतलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

मतदानासाठी अनेकजणांचा मूळ गावी जाण्याचा बेत असेल तर त्यामध्ये बदल करावा लागणार आहे. कारण मंगळवारी दुपारपूर्वीच जिल्ह्यातील ४६८ बस गाड्या निवडणूक कामात गुंतल्या आहेत. मंगळवारीच ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. सोमवारी मुक्कामी गेलेल्या अनेक गाड्या परत येताच थेट डेपोत थांबल्या. त्यानंतर दुपारी जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रावर या बस रवाना झाल्या.

मंगळवारी कर्मचाऱ्यासह मतदान साहित्य घेऊन या बस मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर बुधवारी मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांना परत स्ट्राँगरुमपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडविण्याची जबाबदारी एसटीवर आहे. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे बुधवारीही लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

वाहकांना नाही ड्यूटी

४६८ एसटी बस निवडणूक कार्यक्रमात गुंतल्यामुळे या ठिकाणी केवळ चालकाची आवश्यकता आहे. यामुळे सोमवार ते बुधवार या काळात अनेक वाहकांच्या ड्यूटी रद्द झाल्या आहेत. एसटीची वाहतूक थेट गुरुवारी सकाळपासूनच सुरळीत होणार आहे. यामुळे बुधवारीही वाहकांना ड्यूटी मिळणार नाही.

रेल्वेला गर्दी

मतदान करण्यासाठी ये-जा करण्यासाठी एसटी बसचा भरवसा राहिला नाही, तर दुसरीकडे रेल्वेला मोठी गर्दी उसळी आहे. सोलापूर शहरतील अनेक मतदार हे पुणे- मुंबई येथे रोजगारासाठी गेलेले आहेत. यामुळे ते मतदार मतदान करण्यासाठी सोलापूर परत येणार आहेत. यामुळे पुणे मुंबई येथे सोलापूरकडे येणाऱ्या रेल्वेला मंगळवारपासून मोठी गर्दी आहे. दिवाळीनंतर कमी झालेली गर्दी पुन्हा वाढली आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT