Solapur Lok Sabha Ram Satpute eSakal
सोलापूर

Solapur Lok Sabha : सातपुतेंचा ‘मॉर्निंग वॉक’वेळी विकासावर संवाद; श्री सिद्धरामेश्वर देवस्थान तलावाभोवतीच्या वॉकिंग ट्रॅकवर कार्यक्रम

Ram Satpute : सकाळी तलावाभोवती फिरायला आलेल्या शहरवासीयांशी आमदार राम सातपुते यांनी सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

सकाळ वृत्तसेवा

Ram Satpute Morning Walk : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी (ता. ५) सकाळी ‘विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ’ या संवाद कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सोलापूरसह राज्य आणि देशभरात केलेल्या विकासकामांविषयी चर्चा करीत प्रश्‍नही जाणून घेतले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर देवस्थानच्या तलावाभोवतीच्या ‘वॉकिंग ट्रॅक’वर हा कार्यक्रम झाला.

सकाळी तलावाभोवती फिरायला आलेल्या शहरवासीयांशी आमदार राम सातपुते यांनी सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाची प्रशंसा करीत पुन्हा ते पंतप्रधान बनण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी आपण भाजपच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिली. अनेक तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांना विकासाची ग्वाही दिली.

आमदार सातपुते म्हणाले, सोलापुरात आयटी पार्क आणणे, सोलापूरकरांना दररोज पाणी देणे, युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे, गारमेंट पार्क, वर्ल्ड एक्झिबिशन सेंटर, एमआयडीसीतील सुविधा, व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे या विषयांना अग्रक्रम राहील. ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहील, याचे मी अभिवचन देतो. आमदार सातपुते यांनी खंदक बागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला.

चाय पे चर्चा

मॉर्निंग वॉकनंतर सातपुते यांनी नागरिकांसोबत चहा घेत चर्चा केली. यावेळी आमदार सातपुते यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

तुम्ही टीका करा, आम्ही विकास करू

आमदार सातपुते म्हणाले, तुम्ही माझ्यावर टीका करा, आम्ही भाजपने केलेली पाच कामे सांगू. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करा, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली २५ विकासकामे सांगू. तुम्ही भाजपवर टीका करा, आम्ही भाजपने केलेली हजारो विकासकामे सांगू. कोणी कितीही टीका केली तरी भाजप विकासकामाच्या मार्गावरून हटणार नाही. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराशेजारील वॉकिंग ट्रॅकदेखील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेच बनविला असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT