Lumpy skin disease  sakal
सोलापूर

Solapur : लम्पीच्या भीतीने यंदा गड्डा यात्रेत फक्त म्हशीच

आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या बाजारात गायी व बैलांना परवानगी नाही

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : एकेकाळी खिलार बैलांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या गड्डा यात्रेतील जनावरांचा बाजार यंदा फक्त म्हशींसाठीच आहे जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव असल्याने यंदा गड्डा यात्रेतील जनावरांच्या बाजारात गायी व बैलांना परवानगी नाकारण्यात आली असून, यंदाचा बाजार फक्त म्हशींसाठी भरणार आहे. जिल्ह्यात लम्पी या विषाणूजन्य व संसर्गजन्य आजारामुळे शेकडो गायी, बैल व वासरांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ८ सप्टेंबर २०२२ रोजीच्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण राज्य हे नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.

जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार भरविण्यास निर्बंध घालण्यात आले होते. आता हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त १४ जानेवारीपासून श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जनावरांचा बाजार भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लम्पीच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या बाजारावर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. नव्या आदेशानुसार म्हशींचा बाजार भरविण्यास सर्वत्र परवानगी देण्यात आली आहे. गोवंशीय म्हणजेच गाय, बैल व वासरे यांचा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या गड्डा यात्रेच्या बाजारात गाईंचा समावेश करता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांतील जनावरांवर असणार बंदी

अमरावती, नाशिक महसुली विभागातील कोणत्याही जिल्ह्यांमधून सोलापूर जिल्ह्यात गुरांची ने-आण करता येणार नाही. पुणे, औरंगाबाद, नागपूर या महसुली विभागातून केवळ संक्रमित नसलेल्या व लसीकरण केलेल्या गुरांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र वाहतुकीदरम्यान सोबत असणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT