सोलापूर

सोलापूर महापालिका देणार शहरवासियांना मास्क

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व नागरिकांना महापालिकेच्या वतीने मास्क वाटण्यात येणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपमहापौर राजेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त व समितीच्या सदस्यांची बैठक काल सोमवारी रात्री झाली. 

या बैठकीला गटनेते किसन जाधव, रियाज खरादी, सभापती जय साळुंके, कुमुद अंकाराम, नगरसेवक राजकुमार हंचाटे, नगरसेविका कामिनी आडम, वैभव हत्तुरे, आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त डॉ. पंकज जावळे, नगर अभियंता संदीप कारंजे उपस्थित होते. मास्क न घातल्यास शहरातील नागरिकांना दंड आकारला जात आहे. मात्र, त्या आधी सर्वांना मास्क द्या आणि त्यानंतरही नागरिकांनी त्याचा वापर केला नाही, तर दंड आकारा अशी सूचना बैठकीत करण्यात आली. त्यानुसार कार्यवाही करण्याचे ठरले. 

विडी उद्योगाबाबत आयुक्त पी. शिवशंकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या संदर्भात श्री. करली यांनी, कारखानदारांशी बैठक घ्या त्यानंतर निर्णय घ्या, अशी सूचना केली. शहरात विडी गोळा करण्याचे 138 पॉइंट आहेत. प्रत्येक पॉइंटला सकाळी 500 आणि सायंकाळी 500 कामगार एकत्रित येतात. त्याऐवजी कारखानदारांनी एक ऐवजी चार पॉइंट करावेत त्यामुळे कामगारांची विभागणी होईल, असा पर्याय त्यांनी सुचविला. मात्र आयुक्तांनी शासनाच्या निर्णयानुसारच कार्यवाही ठेवावी लागेल, असे स्पष्ट केले. 

सोलापूर शहरातील सर्व नागरिकांचा सर्व्हे करण्यात यावा, ज्येष्ठ नागरिकांना आवश्‍यक त्या गोळ्या औषधे पुरवावीत, अत्यावश्‍यक सेवेंतर्गत ड्रेनेज व जलवाहिनीचे काम सुरू करावे, अशी मागणी केली. मात्र सोलापूर रेड झोनमध्ये असल्याने ही कामे करता येत नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलुचिस्तानचं नवं चलन 'बलोची फालूस' नेमकं काय? भारताच्या १००० रुपयांचे किती होतील?

'तू भारतासाठी भरपूर केलंस...'; गौतम गंभीरचा 'हिटमॅन' रोहित शर्माला मॅसेज, India vs England मालिका शेवटची? नेमकं काय घडलं?

आदेश बांदेकर तुमच्याही घरी येऊ शकतात! झी मराठीच्या 'होम मिनिस्टर'मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं? फक्त एक गोष्ट

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

KashiVishwanath-BHU : काशी विश्वनाथ धामचा परिणाम! BHU मध्ये पर्यटन शिक्षणासाठी नवे केंद्र, पदवी ते PhD पर्यंत अभ्यासक्रम

SCROLL FOR NEXT