solapur sakal
सोलापूर

Solapur : सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील योजना, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात २०२३ अखेर सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्यात पहिला क्रमांकावर बाजी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, ता. १७ : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात २०२३ अखेर सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्यात पहिला क्रमांकावर बाजी मारली आहे. आरोग्याच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविल्याने सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. राज्यात आरोग्य विभागाअंतर्गत जवळपास ३५ उपक्रमांआधारे सर्व जिल्हा परिषदांचे मूल्यांकन केले जाते.

यामध्ये माता आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, क्षयरोग दुरीकरण, कुष्ठरोग शोध मोहीम, असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना, आयुष्यमान भारत योजना, गुणवत्ता आश्वासन, कुटुंब कल्याण कार्यक्रम, आर्थिक खर्चाचा आढावा, मनुष्यबळ माहिती अद्ययावत करणे, टेली कन्सल्टेशन तसेच राष्ट्रीय नागरी अभियानांतर्गत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, साथरोग नियंत्रण कार्यक्रम असे उपक्रम समाविष्ट आहेत.

या सर्व योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त धीरजकुमार यांनी पत्र पाठवून सोलापूर जिल्हा परिषदेला त्यासंदर्भातील माहिती दिली आहे.राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात सोलापूर जिल्ह्यासाठी ४३.१२ गुण आहेत. तर सांगलीला ४२.४६, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यास ४१.६ गुण मिळाले आहेत.

आरोग्य विभागामधील सर्व वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नियमित आढावा बैठका घेऊन ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २०२४-२५ मध्येही सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अग्रस्थानी ठेवण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आले आहे.

- मनिषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT