corona effect 
सोलापूर

केंद्राच्या पथकाकडून सोलापुरातील कोरोनाबाधित परिसराची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही सर्वांच्याच  चिंतेचा विषय झाला आहे. बारा एप्रिल रोजी सोलापुरात पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला व त्या रुग्णाचा मृत्यूही झाला. त्यानंतर अवघ्या 14 दिवसांमध्ये 26 एप्रिल रोजी सोलापुरातील बाधित रुग्णांची संख्या ही एकसष्ठ झाली व पाच जणांचा मृत्यू झाला. सोलापुरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व त्यावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे चार जणांचे पथक आज  सोलापुरात दाखल झाले आहे. 

सोलापुरातील विविध भागाची पाहणी या पथकाच्यावतीने केली जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. ए. के. गडपाले, डॉ. व्ही.  एस.  रंधवा, डॉ. सागर बोरकर व डॉ. अंशु गुप्ता या  चार जणांचे पथक सोलापुरात आले असून सोलापुरातील उपायोजना व कोरोनाबाधित  परिसराची पाहणी केली जात आहे. सोलापुरातील पहिला कोरोनाबधित रुग्ण हा तेलंगी पाछा पेठ परिसरात आढळला असून तेलंगी पाछा पेठ भागाची पाहणी या पथकाने केली आहे. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोग शाळेत कोरोना चाचणी केली जाते. या पथकाच्यावतीने महाविद्यालय व प्रयोग शाळेचीही पाहणी करण्यात आली आहे. या पथकासोबत सोलापूरचे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत. सोलापुरातील कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी करून हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. या अहवालावर केंद्र सरकार व राज्य सरकार काय निर्णय घेते, काय उपाय योजना राबविते याकडे संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेचा अजब कारभार! 132 पदांसाठी भरती कोकणात, पण मुलाखती चक्क आंध्र प्रदेशात; स्थानिक तरुणांमध्ये तीव्र संताप

SCROLL FOR NEXT