महापालिका आयुक्त म्हणाले, "परिवहन'चे खासगीकरणच उचित ठरेल ! Esakal
सोलापूर

महापालिका आयुक्त म्हणाले, "परिवहन'चे खासगीकरणच उचित ठरेल !

महापालिका आयुक्त म्हणाले, "परिवहन'चे खासगीकरणच उचित ठरेल !

वेणुगोपाळ गाडी

महापालिका परिवहन उपक्रम चालविणे महापालिकेला परवडणारे नसल्याने त्याचे खासगीकरण करणेच उचित ठरेल, असे मत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी व्यक्त केले.

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रम चालविणे महापालिकेला परवडणारे नसल्याने त्याचे खासगीकरण करणेच उचित ठरेल, असे मत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर (Municipal Commissioner P. Shivshankar) यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केले. महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा (Budget meeting) आज (मंगळवारी) होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन उपक्रमाबाबत अंदाजपत्रकामध्ये भरीव तरतूद व्हावी या मागणीसाठी समिती सभापती जय साळुंके, ज्येष्ठ नगरसेवक तथा परिवहन कामगार नेते यू. एन. बेरिया यांनी परिवहनसंदर्भात बैठक घेण्याची विनंती महापौरांकडे केली होती. त्यानुसार महापौर श्रीकांचना यन्नम यांनी बैठक घेतली. (The Municipal Commissioner said that only privatization of the transport department would be appropriate-ssd73)

या वेळी सभागृहनेता शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, सभापती जय साळुंके, यू. एन. बेरिया, महेश कोठे (Mahesh Kothe), आयुक्‍त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आदी उपस्थित होते. या वेळी चर्चेत आयुक्तांनी परिवहनच्या खासगीकरणाचा मुद्दा अधोरेखित केला. खासगीकरणाचे तीन पर्याय आहेत. यापैकी योग्य पर्याय निवडू, पण याकरिता परिवहन समिती व महापालिका सभेची मान्यता आवश्‍यक असल्याचे सांगितले.

या वेळी गटनेत्यांनी खासगीकरणाला अनुकूलता दर्शविली तर सभापती साळुंके यांनी पक्षपातळीवर याबाबत चर्चा करून भूमिका ठरवू, असे सांगितले. परिवहन कर्मचाऱ्यांचे 18 महिन्यांचे वेतन थकीत असल्याच्या मुद्‌द्‌यावरही या वेळी चर्चा झाली. अंदाजपत्रकात थकीत वेतनाबाबत तरतूद करण्याची मागणी बेरिया व साळुंके यांनी केली. यावर महापौरांनी जास्तीत जास्त तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले.

परिवहन व्यवस्थापकपदासाठी जाहिरात

परिवहन उपक्रमाला पूर्ण वेळ व्यवस्थापक नेमण्यासाठी जाहिरात दिली आहे. सद्य:स्थितीत कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांकरिता हे पद भरण्यात येणार आहे. शासनाकडून या पदासाठी अधिकारी मिळावा याकरिता महापालिकेकडून शासनाला पत्र पाठविण्यात येईल, असे आयुक्तांनी या बैठकीत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal flood: नेपाळ महापूर! नऊ दिवस फक्त 'हरे कृष्ण'चा जप अन् ऐन जन्माष्टमीच्या दिवशी बोगद्यातून जिवंत बाहेर काढलं

Japanese Habits for Stress Relief: सतत टेन्शनमध्ये असता? स्ट्रेसपासून दूर राहायचंय? मग जपानी पद्धतीच्या ‘या’ ४ सवयी आजच अंगीकारा!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नावावर मोठा विक्रम; पंतप्रधान मोदींनीही दिल्या शुभेच्छा, नेमकं काय म्हणाले?

Marathi News Live Updates : धुळ्यात एसटी बसचा भीषण अपघात, ट्रकची जोरदार धडक, ४५ विद्यार्थी जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर

Nagpur Vehicle Theft Case: गोळीबारातील आरोपीला वाहनचोरी प्रकरणात अटक; साथीदारही ताब्यात; गणेशपेठ पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT