भाजप  sakal
सोलापूर

BJP : आपण ज्या रस्त्याने फिरता, त्याची निर्मिती भाजपची

भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : विरोधकांनी सत्तेवर असताना खुर्च्या उबवण्याचे काम केल्याची टीका करीत लोकसभेचे भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी गेल्या दहा वर्षांत भाजपने केलेल्या कोट्यवधींच्या कामांची यादीच वाचली. तसेच काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे आज ज्या रस्त्याने फिरत आहेत, ते रस्ते भाजपनेच केल्याचा टोला लगावला.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ समित्यांच्या संवाद मेळाव्यात सोमवारी (ता. १) बोलत होते. विकासकामे, नेतृत्वाच्या मुद्यावर कोणत्याही चौकात या, चर्चा करू, मीच काय आमचा बुथप्रमुखही आपल्याला उत्तर देईल, असे आव्हान सातपुते यांनी दिले. आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील दहा गावांना जेवढा निधी दिला तेवढा निधीतरी मध्यमध्ये आणला आहे काय, असा सवालही केला. ४० हजार कोटींचे रस्ते, बाह्यवळण रस्ते, विडी कामगारांसाठी ३० हजार घरे, विद्यापीठाला ६५० कोटी, भूमिगत गटारींसाठी ९५० कोटी, मुद्रा योजनेंतर्गत अडीच लाख लोकांना १७ कोटींचे कर्ज, अडीच लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस, ८५० गावांत पाणी या कामांची यादी जाहीर केली.

दहाच काय शेकडो कामे सांगू शकतो. भाजपने शेकडो वर्षांपासून प्रलंबित हिंदूंच्या अस्मितेचा राममंदिराचा प्रश्न सोडवून मंदिर बांधले. ही निवडणूक देशाच्या विकासाची, सुरक्षेची असून सोलापुरात राजकन्येविरोधात एका सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाची लढाई असल्याचे सांगत जुलैमध्ये विमानतळाचे काम संपणार असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधक सत्तेवर असताना व आम्ही दहा वर्षांत केलेल्या विकासाची तुलना करा, असे आव्हान आमदार सुभाष देशमुख यांनी दिला. तसेच विरोधक विकासाचे मुद्दे संपले की संविधान संपवणार असल्याचे रडगाणे गातात, भाजपला मुस्लिमविरोधी ठरवितात, असे सांगत दहा वर्षांत संविधान का संपले नाही, असा सवाल केला. मतदारसंघात एमआयडीसी उभारणारच याची ग्वाही देत रस्ते, पर्यटन विकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, सातपुते यांनी बूथ वॉरिअर्सशी संवाद साधत मतदारसंघातील प्रश्नांविषयी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT