toll_plaza 
सोलापूर

पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलच्या दरात वाढ ! जाणून घ्या कुठल्या नाक्‍यावर किती द्यावा लागेल टोल

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : दरवर्षी महामार्गावरील टोल दरात वाढ होत असते तशी या वर्षीही वाढ करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील टोल दरातही 1 एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. 

असे आहेत नवीन दर 
सोलापूर - पुणे रस्त्यावरील पाटस टोलनाका इथे मोटारी, हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरिता 75 तर दुहेरी (रिटर्न टोल) प्रवासाकरिता 115 रुपये टोल द्यावा लागणार आहे. सरडेवाडी टोल नाक्‍याला मोटारी, हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरिता 80 तर दुहेरी प्रवासाकरिता 120 रुपये टोल भरावा लागेल. बस किंवा ट्रक या वाहनांकरिता टोलचे दर एकेरी प्रवासाकरिता 255 आणि दुहेरी प्रवासाकरिता 380 रुपये असतील. 

याशिवाय पुणे-सातारा व पुणे - नाशिक महामार्गावरील टोल आजपासून (1 एप्रिल) नवीन दर लागू करण्यात आले आहेत. 

दरवर्षी प्रमाणे यंदाही टोल दरवाढ झाली आहे. मात्र फास्टॅग सिस्टीम सुरू होऊनही टोल नाक्‍यांवरील रांगा मात्र कमी झाल्या नाहीत. अनेक टोल नाक्‍यांवर पायाभूत सुविधांचा अभाव असून, काही मार्गांची दुरुस्ती आवश्‍यक असताना टोल दरवाढीचा दरवर्षाचा कार्यक्रम मात्र कायम राहिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; माहिती मिळताच ACB चा सापळा, ठाण्यातील मोठा अधिकारी अटकेत

MRP Protest Delhi: एमआरपीतील त्रुटींविरोधात जंतर-मंतरवर राष्ट्रीय आंदोलन; महाराष्ट्रातून ५०० कार्यकर्ते नवी दिल्लीत रवाना

Latest Marathi News Live Update : ‘काळा पैसा आणि कर आकारणी कायद्या’अंतर्गत अनिल अंबानींविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

SCROLL FOR NEXT