solapur mahapalika sakal
सोलापूर

आयुक्तांच्या बदल्यांवर नाराजी! परीक्षेत कमी पडलेले कनिष्ठ अभियंते पुन्हा पूर्वीच्याच विभागात

तत्कालीन महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाची कितपत माहिती आहे, याची पडताळणी परीक्षेद्वारे केली. त्यात चांगले गुण मिळविलेल्यांना संबंधित विभागात काम करण्याची संधी दिली. पण, नवीन आयुक्तांनी त्यावेळी परीक्षेत इतरांच्या तुलनेत कमी गुण घेतलेल्या दोन कनिष्ठ अभियंत्यांना पुन्हा त्याच विभागाची जबाबदारी दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : तत्कालीन महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाची कितपत माहिती आहे, याची पडताळणी परीक्षेद्वारे केली होती. त्यात चांगले गुण मिळविलेल्यांना संबंधित विभागात काम करण्याची संधी दिली. पण, नवीन आयुक्तांनी आता त्यावेळी परीक्षेत इतरांच्या तुलनेत कमी गुण घेतलेल्या दोन कनिष्ठ अभियंत्यांना पुन्हा त्याच विभागात काम करण्याची जबाबदारी दिली आहे.

महापालिकेत काम करताना अनेक वर्षे होऊनही कर्मचाऱ्यांना संगणक चालवायला येत नाही. संगणकावर टायपिंग जमत नाही. कामकाजाची पद्धती माहिती नाही आणि त्यामुळे कामे संथगतीने होत असल्याच्या तक्रारी तत्कालीन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे प्राप्त झाल्या. सामान्यांसाठी प्रशासन अधिक गतिमान व्हायला हवे, या उद्देशाने त्यांनी लोकप्रतिनिधींना दाद न देता कनिष्ठ अभियंत्यांसह खालील सर्वच खातेप्रमुखांची परीक्षा घेतली. पी. शिवशंकर यांनी स्वत: लेखी प्रश्नपत्रिका तयार केली होती.

तसेच परीक्षा केंद्रावर ते स्वत: परीक्षक म्हणून थांबले होते. त्यावेळी अनेकांचे पितळ उघडे पडले. पण ‘नवा गडी नवा राज’ या म्हणीप्रमाणे आता त्यावेळी परीक्षेत जास्त गुण मिळवलेले विभागीय कार्यालयाला तर कमी गुण मिळालेले महापालिकेतील महत्त्वाच्या विभागात रुजू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता श्री. धनशेट्टी यांच्याकडे अनेक वर्षांपासून स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून पदभार सोपविण्यात आला होता. मात्र, आता त्यांच्याकडील दोन्ही पदभार काढून सहायक अभियंता व्यंकटेश चौबे यांच्याकडे स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व शहराच्या पाणीपुरवठ्याचा वितरण विभागाची जबाबदारी दिली आहे.

निलकंठ मठपती यांच्याकडे वॉटर ट्रान्समिशन व डब्ल्यूटीपी संबंधित कामे (सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय) सोपवली आहेत. सारिका आकुलवार यांची बांधकाम परवाना विभाग, तपन डंके यांच्याकडे रस्ते कामकाज (नगर अभियंता कार्यालय), आवेक्षक महेश क्षीरसागर यांची सिटी सर्व्हे, डेव्हलपमेंट प्लान, जमीन अधिग्रहण, ले-आऊट आणि संचालक नगररचना विभाग कार्यालय, प्रकाश दिवाणजी यांची विभागीय कार्यालय- सहा, प्रकाश सावंत यांची विभागीय कार्यालय- एक, सतीश एकबोटे यांच्याकडे विभागीय कार्यालय- सात, अशा जबाबदाऱ्या दिल्या आहेत. तसेच मधुसुदन पवार (मानधन आवेक्षक) यांची विभागीय कार्यालय एक येथे बदली केली आहे.

दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

बदली झालेल्या अधिकाऱ्यांना संबंधित नियंत्रण अधिकारी तथा खातेप्रमुखांनी तात्काळ कार्यमुक्त करावे. कार्यभार हस्तांतरण व बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन लिखित स्वरूपात कार्यभार स्वीकारावा. बदली झालेल्यांपैकी कोणत्याही अधिकाऱ्याने बदली रद्द तथा बदल करण्यासाठी राजकीय दबाव आणल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT