Ujanis water storage came in at 36 percent 
सोलापूर

'उजनी'चा पाणीसाठा आला 36 टक्‍क्‍यांवर

संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मागील वर्षी 100 टक्के भरले होते. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे हे किमया साध्य झाली होती. मात्र, आजअखेर धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी 36 इतकी झाली आहे. सध्या साधारणपणे दररोज एक टक्के पाणीसाठा कमी होत आहे. दरम्यान, कालव्याच्या माध्यमातून उन्हाळी आवर्तन एक मेपासून सुरु केले जाणार आहे. 

उजनी धरणातून सध्या आठ हजार 100 क्‍सुसेकने पाणी भीमा नदीमध्ये सोडले जात आहे. सोलापूर शहराला पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. पुढील आठ- नऊ दिवसांमध्ये हे पाणी औज बंधाऱ्यात पोचण्याची शक्‍यता आहे. भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे पाच टीएमसी पाणी कमी होणार आहे. याशिवाय सध्या धरणातून कालव्याच्या माध्यमातून तीन हजार क्‍सुसेकने तर बोगद्यातून एक हजार 125 क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. बोगद्यातून सोडलेले पाणी सीना नदीमध्ये येते. हे पाणी या नदीवर शेवटी असलेल्या कोर्सेगाव बंधाऱ्यात पोचेपर्यंत सीना नदीकाठच्या दोन्ही बाजूंचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पिण्याच्या पाणीसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा केला जाणार आहे. वीजपुरवठा बंद असल्याने कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचण्यास उशीर लागणार नाही. उजनी धरणामध्ये 23 मार्चला 53 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा होता. तो पाणीसाठा जवळपास 16 दिवसांमध्ये 16 टक्‍यांनी कमी झाला आहे. म्हणजेच धरणातून दररोज जवळपास एक टक्के पाणीसाठा कमी होत आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा अद्यापही टिकून आहे. मागील वर्षीच्या पाणीसाठ्याच्या टक्केवारीचा विचार केला असता आजच्या दिवशी धरणात वजा 27 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा होता. यावरुन यंदाच्या वर्षी धरणाची स्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्ट होते. 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT