pm_modi_vaccination 
सोलापूर

लसीकरणाला सर्व्हरचा अडथळा ! लसीच्या एका बाटलीत दहा जणांना इंजेक्‍शन; चार तासांतच लस टोचणे बंधनकारक

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होऊन हे संकट कायमस्वरूपी हद्दपार व्हावे, या उद्देशाने कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचली जात आहे. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना लस टोचली जात असून खासगी रुग्णालयांमध्ये एका डोससाठी अडीचशे रुपये द्यावे लागणार आहेत. तर सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस मोफत मिळणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी लोक येतील की नाही, या चिंतेत बहुतेक रुग्णालयांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तर काही रुग्णालयांनी पहिल्या डोसचे शंभर रुग्णांसाठी 15 हजार रुपये भरूनही सर्व्हर डाऊन असल्याने त्या रुग्णालयांची ऑनलाइन नोंदणी दिसत नाही. त्यामुळे लसीकरण थांबले आहे.

दुसरा डोस घेणाऱ्यांची नावेच दिसत नाहीत 
राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर त्या व्यक्तीला दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेले लोक आता दुसऱ्या डोससाठी रुग्णालयांमध्ये येऊ लागले आहेत. मात्र, लसीकरणाच्या ऑनलाइन पोर्टलवर त्या व्यक्तींची नावे दिसत नसल्याने त्यांनाही त्या ठिकाणी ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 43 रुग्णालये आहेत. या सर्व खासगी रुग्णालयांना कोरोनावरील लसची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत लस मिळणार असल्याने खासगी दवाखान्यांमध्ये लोक लस टोचून घेण्यासाठी येणार नाहीत, या भूमिकेतून बहुतांश खासगी रुग्णालयांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कालपासून (ता. 1) लसीकरणाचे पोर्टल स्लो (सर्व्हर डाऊन) असल्याने ठरलेल्या उद्दिष्टानुसार लसीकरण होऊ शकले नाही. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू करण्यापूर्वी त्या रुग्णालयाला शंभर रुग्णांसाठी पंधरा हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांनी पैसे भरले याची ऑनलाइन पावती त्या पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर त्यांची ऑनलाइन नोंदणी होणार आहे. त्यानंतर त्यांना लसीकरणाची परवानगी दिली जात आहे. मात्र काही रुग्णालयांनी पैसे भरूनही ऑनलाइनमध्ये त्यांचे नाव दिसत नसल्याने त्या ठिकाणी लसीकरणाला सुरवात झालेली नाही. या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी आलेले रुग्ण पुन्हा घरी परत जात आहेत. 

सोलापूर जिल्ह्याला मिळाले 41 हजार डोस 
सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे. खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना लस टोचली जात आहे. तर दुसरीकडे पहिला डोस घेउन 28 दिवस झालेल्यांनाही दुसरा डोस दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला आणखी 41 हजार डोस उपलब्ध झाले असून सध्या 60 हजार डोस शिल्लक आहेत, अशी माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. जिल्ह्यातील चार लाख 13 हजार 405 तर शहरातील एक लाख सहा हजार 635 गंभीर आजार असलेल्यांना या टप्प्यात लस टोचली जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

ठळक बाबी... 

  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांमध्ये लस टोचण्याची सोय 
  • रुग्णालयांनी पंधरा हजार रुपये भरल्याशिवाय लस टोचण्याची परवानगी नाहीच 
  • एकावेळी 100 जणांनाच टोचता येईल लस; खासगी रुग्णालयांमध्ये असताना भरावे लागतील अडीचशे रुपये 
  • सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस टोचण्याची सोय; गर्दी वाढल्यास उपाययोजनांचा आराखडाच नाही 
  • रुग्णालयांनी पैसे भरूनही होईना सर्व्हरवर नोंदणी; लस पोचण्यासाठी लोक येतील की नाही या चिंतेत रुग्णालये पैसे भरण्यास तयार नाहीत 
  • 16 जानेवारीला पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची दुसऱ्या डोससाठी वाढली गर्दी; सर्व्हर डाऊन असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची नावे दिसेनात 
  • एकदा लसीची बाटली फोडल्यानंतर चार तासांत 10 जणांना इंजेक्‍शन देणे बंधनकारक; चार तासांनंतर ती लस वापरता येणार नाहीच 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT