Waluj 
सोलापूर

गाव करील ते राव काय करेल! वाळूजकरांनी केला ऐंशी हजारांच्या लोकवर्गणीतून "इतक्‍या' किलोमीटरचा रस्ता 

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : सरकारी यंत्रणेच्या कारभाराला वैतागलेल्या वाळूजकरांनी 80 हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून वाळूज-मनगोळी हा तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. यामुळे "गाव करील ते राव काय करेल!' ही म्हण गावकऱ्यांनी सार्थ ठरवली आहे. याच रस्त्यासाठी मनगोळीकरांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवर शंभर टक्के बहिष्कार घातला होता. मात्र सरकारी यंत्रणेला आणि निवडणुकीपुरते मते मागायला येणाऱ्या सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना घाम फुटला नाही. 

वाळूज (ता. मोहोळ) ते धानोरे (ता. माढा) हा सहा किलोमीटरचा जिल्हा मार्ग आहे. वाळूजपासून तीन किलोमीटर अंतरावर मनगोळी फाट्यापर्यंतच्या तीन किलोमीटर रस्त्याच्या मुरमीकरणाचे काम लोकवर्गणीमधून करण्यात आले आहे. याकामी ट्रॅक्‍टर, जेसीबी, मुरूम सपाटीकरण करण्यासाठी लागणारे मजूर यांचा सामावेश आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात थोडा पाऊस पडला, तरी या रस्त्यावरून चालणे अवघड होते. शेतकरी, शेतमाल वाहतूक करणारी तीन व चारचाकी वाहने, ट्रॅक्‍टर, दुचाकीसह इतर प्रवासी वाहनांची येथून सतत वर्दळ असते. रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडून गेली होती. त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. मोठे खड्डे आणि त्यात साठलेले पावसाचे पाणी, चिखल यामुळे वाहने तर सोडाच चालणे देखील मुश्‍कील होत होते. प्रसंगी छोटे-मोठे अपघातही होत होते. 

या रस्त्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत होते. आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. या सर्व गोष्टींना कंटाळून आणि शासनाच्या मदतीची वाट न पाहता या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी गोळा करून रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम चालू केले आहे. यामुळे शेतमाल व शेतीची अवजारे ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांचा व वाहनचालकांचा त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे. याकामी रामभाऊ बुद्रूक, कल्याण कादे, श्रीनिवास मोटे, यशवंत घाडगे, प्रकाश मोटे, संजय आतकरे, सचिन कादे, दीपक मोटे, रवींद्र कादे, शांतिलाल मोटे, संतोष पाटील, विकास पाटील, अजित कादे, धनंजय नवले, महेश कादे यांचे सहकार्य लाभत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT