vinayak raut and prasad lad Sakal
सोलापूर

Vinayak Raut : प्रसाद लाड यांनी केली अनेक पक्षांत बाडगेगिरी; विनायक राऊतांची जहरी टीका

Solapur latest News in marathi | अजित पवार यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा टोला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महायुती व महाविकास आघाडी मधील नेत्यांमधील धुसफूस काही केल्या कमी होताना सध्या दिसत नाही. अक्कलकोट येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर अनेक पक्षातून बाडगेगिरी करणारा नेता असा उल्लेख करत जहरी टीका केली.

यावेळी विनायक राऊत यांनी टीका करताना प्रसाद लाड हे काही सच्चे भाजपवासी नाहीत. ते अनेक पक्षातून बाडगेगिरी करत सध्या भाजपत असे राऊत म्हणाले. त्यांच्याकडे केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तळी उचलण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस घरी बसतील व त्यानंतर पुन्हा प्रसाद लाड हे दुसऱ्या तंबूत जातील, अशी खोचक टीका यावेळी केली. आता लाड हे केवळ व्यापारी वृत्तीने तयार झालेले भाजपतील नेते आहेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता कामाबाबत फारसे गांभीर्य राहिले नाही, अशी बोचरी टीका करतानाच अजित दादांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपाबाबत आमचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. पारंपारिक मतदारसंघ मविआतील त्या-त्या घटक पक्षांकडेच राहतील. ज्या जागांवर विजयाची शक्यता आहे, त्यांचा दावा योग्य वेळी उघड करण्यात येईल असेही राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT