Crime news sakal
सोलापूर

विवाहाच्या आमिषाने महिलेवर अक्कलकोट, दादर, कल्याण येथे अत्याचार! विवाह तर नाहीच युवकाने 16 लाख लुबाडले

विवाहाचे आमिष दाखवून अक्कलकोट, दादर व कल्याण (ठाणे) येथील लॉजवर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत तिच्यावर अत्याचार केले, पण त्याने विवाह केला नाही. अखेर त्या महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : एप्रिल 2007 रोजी त्या महिलेचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा झाला, मात्र पती पत्नीमधील वैयक्तिक मतभेदांमुळे दोघेही एका वर्षात विभक्त झाले. त्यानंतर राकेश गायकवाड नावाच्या सोलापुरातील युवकाने त्या महिलेशी जवळीक वाढवली. विवाहाचे आमिष दाखवून अक्कलकोट, दादर व कल्याण (ठाणे) येथील लॉजवर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत तिच्यावर अत्याचार केले, पण त्याने विवाह केला नाही. त्याविरुद्ध संबंधित महिलेने सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पतीपासून विभक्त महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवून राकेश याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर देवदर्शनासाठी जाण्याच्या बहाण्याने वाटेतच तिच्यावर विवाहाचे आमिष देऊन पहिल्यांदा एप्रिल 2016 मध्ये अत्याचार केला. त्यावेळी त्या महिलेच्या 15 वर्षीय मुलाला नाव देतो, माझ्याकडे खुप पैसा असून तुला काम करायची गरज नाही, सुखात ठेवेन म्हणून अत्याचार केला. त्यानंतर मुंबई, दादर येथे येऊन अत्याचार केले. विश्वास संपादन करून त्याने शरीरसंबंध ठेवले. त्याचबरोबर त्याने व्यवसाय सुरु करायचा आहे, लोकांकडून घेतलेले पैसे द्यायचे आहेत, भिशी भरायची आहे, कुटुंबातील सदस्यांचे गहाण ठेवलेले दागिने सोडवायचे आहेत, असे वेगवेगळे बहाणे सांगून तब्बल 16 लाख रुपये घेतले. पण, त्यानंतर त्याने भेटणे, बोलणे बंद केले. त्याने विवाह पण नाही केला आणि पैसे पण परत दिले नाहीत. त्यामुळे पोलिसांत फिर्याद दिल्याचे संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिस तपास करीत आहेत.

विवाह झाला असतानाही ती गोष्ट लपवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT