Wait a few more days for the historical mahanatya of Shivputra Sambhaji Maharaj organized for the first time at Pandharpur.jpg 
सोलापूर

महानाट्याची आणखी काही दिवस प्रतीक्षा : अभिजित पाटील

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : शिवजयंतीनिमित्त पंढरपूर येथे प्रथमच आयोजित शिवपुत्र संभाजी महाराज या ऐतिहासिक महानाट्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली होती. सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंडप सजले होते, प्रवेशिका तयार झाल्या होत्या. परंतु मागील आठवड्यापासून कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जबाबदारीचे एक पाऊल पुढे टाकत हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असली तरीही संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकाच वेळी असंख्य नागरिकांची सोय असलेल्या आणि 5 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमास असंख्य लोकांच्या उपस्थितीची शक्‍यता होती. ही शक्‍यता लक्षात घेऊन अभिजीत पाटील यांनी एक सकारात्मक उदाहरण प्रस्तुत केल्याची चर्चा परिसरात घडत आहे. मैदान, मंडप तसेच नाट्य कलाकार यावर झालेल्या खर्चाचा विचार न करता नागरिकांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन त्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला कायम प्रथम स्थान दिले. त्यांनी घालून दिलेला आदर्श त्यांच्याच जयंतीला आपण डावलू शकत नाही. आपल्या राजाचा जयंती महोत्सव मनासारखा साजरा करण्यासाठी आपण काहीशी वेगळी वाट धरणे या वर्षी आवश्‍यक आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात घालून जयंती साजरी करणे हे साक्षात छत्रपतींना देखील आवडणार नाही. काळ कठीण आहे. या वर्षी विठ्ठलाची वारी देखील होऊ शकली नाही आणि आता आपल्या राजाची जयंती साजरी करताना देखील मर्यादा आहेत. पण तरी त्यांनी दिलेली ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने या संकटाचा सामना करू, आणि त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जगू, काही दिवसांनी पुन्हा महानाट्याचे आयोजन करू, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT