सोलापूर

`या` शहरात पाणीचोरीचा असाही स्मार्ट फंडा...

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : घरगुती पाणीपुरवठ्यासाठी अर्धा इंची नळजोड घेतल्याची नोंद असतानाही प्रत्यक्षात पाऊणइंची जोडणी असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या कर वसुली पथकाने नळजोड बंद केला आणि नळ जप्त केला. त्यावेळी एका माजी नगरसेवकाने हस्तक्षेप करीत तोडलेला नळजोड परत देण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला. पश्‍चिम मंगळवार पेठेतील मिळकतदाराबाबत सोमवारी हा प्रकार झाला. 

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे संताप 
महापालिकेच्या कर वसुली पथकाने मंगळवार पेठ परिसरातील वसुली सुरु केली. त्यावेळी एका मिळकतदाराच्या नावावर अर्धा इंची नळजोडाची नोंदणी होती. मिळकत कराची सुमारे 80 हजार रुपयांची थकबाकी असल्याने तेथील नळजोड बंदची कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी पाऊणइंची नळजोड असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. त्यांनी नळजोड बंद करून तो नळ जप्त केला आणि तो महापालिकेच्या भांडारात जमा केला. दरम्यान जप्त केलेला नळ परत देण्यासाठी एका माजी नगरसेवकाने कर्मचाऱ्यावर दबाव आणला. वसुली वाढवा म्हणून अधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाने टार्गेट करायचे आणि त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेवकाने बेकायदेशीरपणे नळजोड घेतलेल्याला पाठीशी घालायचे, या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. 

आजी-माजी नगरसेवकांचा हस्तक्षेप सुरुच 
महापालिकेने सुरु केलेल्या वसुली मोहिमेत काही आजी-माजी नगरसेवकांनी थेट हस्तक्षेप सुरु केला आहे. त्यामुळे वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी, हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यात येईल आणि माजी नगरसेवक असतील तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून फौजदारी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे वसुलीच्या कामात कुणी हस्तक्षेप केला नाही. आता हस्तक्षेपाचे प्रमाण वाढले आहे. मात्र तसे होताना दिसत नाही, त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे डॉ. ढाकणे यांनी शास्ती व नोटीस, वॉरंट फी माफ करण्यास नकार दिला असतानाही वसुली वाढली होती. यंदा शास्तीमध्ये 75 टक्के सवलत आणि नोटीस व वॉरंट फीमध्ये पूर्ण माफी देऊनही अपेक्षेप्रमाणे वसुली झालेली नाही. त्यास हस्तक्षेपाचे कारण सांगितले जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis meets Anna Hazare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला; महिनाभरापासून ताप आणि जुलाबाचा त्रास, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT