corona 
सोलापूर

व्वा...93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील 93 वर्षांच्या आजींची जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने त्या आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर....दुसरी मुलगी कर्णबधीर... अशा परिस्थितीत 93 वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती. 

भाऊ मृत झाल्याने तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब 13 जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे. आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. याठिकाणी वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण दिलं जात होत.

रोज डॉक्‍टर तपासणी आणि रूग्णांची विचारपूस करून जात असत. डॉक्‍टरांनी दिलेला आधार यामुळेच रूग्णांचा निम्मा आजार हद्दपार होत आहे. आजीबाई कोरोनाला धीराने तोंड देत होत्या. 14 दिवस डॉक्‍टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर शनिवारी (27 जून) आजीबाई कोरोनामुक्त होऊन घरी आल्या आहेत. मला पहिल्यापेक्षा आता अधिक चांगले वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट समोर

जान्हवीला वाचवणाऱ्या रामचरणच्या बॉडीगार्डची सगळीकडे चर्चा, नक्की आहे कोण? पगार ऐकून थक्क व्हाल

Consumer Commission : कन्फर्म तिकीट होतं, तरी संपूर्ण प्रवास उभ्याने; अखेर रेल्वेलाच मोजावी लागली मोठी किंमत, नेमकं काय घडलं?

Child Drowns in River : वडील पोहत असताना पोटचा गोळा बुडाला, कोल्हापुरातील शिंगणापूर बंधाऱ्यावरील घटना

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात 'या' मालिकेसाठी संधी मिळणार! निवड समितीच्या मिटिंगला नवा T20I कर्णधारही राहणार हजर

SCROLL FOR NEXT