पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात हॅम रेडिओ स्टेशन सुरू 

सकाळवृत्तसेवा

सातारा - आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनास उपयोगी ठरणारे हॅम रेडिओ स्टेशन आता येथे सुरू झाले आहे. निवृत्त नौदल अधिकारी बसाप्पा अरबोळे यांच्या विशेष सहकार्याने येथील रोहित भोसले आणि कोमल भोसले या पती-पत्नीने त्याचा प्रारंभ केला आहे. हे जिल्ह्यातील पहिले ॲमॅच्युअर हॅम रेडिओ स्टेशन असून, नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास त्याचा नागरिकांना निश्‍चित फायदा होणार आहे. 

केरळ येथे नुकताच महापूर आला. या महापुरात जीवित तसेच वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. परंतु, हॅम रेडिओ स्टेशनमुळे एक हजार ६५० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या त्या ठिकाणी २०० हून अधिक हॅम स्वयंसेवक मदत कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात भूकंपाच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच पाटण-कोयना परिसरात अतिवृष्टी होत असते. अनेक मोठ्या गावांमधल्या यात्रांना गर्दी होत असते. काही वेळेस त्याठिकाणी मोबाईल, दूरसंचार यंत्रणा निकामी होत असते. तसेच आपत्तीदेखील काही सांगून येत नाही. अशा परिस्थितीत हॅम रेडिओ सेवेचा वापर प्रभावी होऊ शकतो. हे नुकतेच केरळमधल्या घटनांनी अधोरेखित केले आहे. हॅम रेडिओचाच वापर त्याठिकाणी मदत कार्यात महत्त्वाचा ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांशी संपर्क ठेवू शकणारी बिनतारी (वायरलेस) संपर्क यंत्रणेचे स्टेशन येथे रोहित व कोमल भोसले यांनी सुरू केले आहे. 

या हॅम रेडिओद्वारा आपण जगभर पसरलेल्या ‘हॅम युजर्स’शी संपर्क साधू शकतो. हॅम रेडिओ हा जरी हौशी छंद असला तरी त्याच्याद्वारे अन्य देशांत संपर्क साधता येत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून शासनाचे काही निर्बंध आहेत. या छंदाचा उपयोग पैसा कमावण्यासाठी करता येत नाही,  या व अन्य नियमांमुळेच हॅम रेडिओचे महत्त्व अबाधित राहते व एक छंद म्हणून किंवा आपत्ती काळात याचा उचित वापर हॅम्सना करता येतो, असे रोहित भोसले यांनी नमूद केले. 

हॅम रेडिओ म्हणजे काय?
एकमेकांशी संपर्क ठेवू शकणारी बिनतारी (वायरलेस) संपर्क यंत्रणा म्हणजे हॅम रेडिओ. हा एखाद्या जुन्या टेलिफोन किंवा वॉकीटॉकीसारखा वाटतो. शक्‍यतो सर्व लॅंडलाइन टेलिफोन हे एकमेकांना तारांद्वारे जोडलेले असतात; पण हॅम यंत्रणा मात्र पूर्णपणे रेडिओ लहरींवर (इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक वेव्हज) चालते. या हॅम रेडिओजना एक ॲन्टेना जोडलली असते व या ॲन्टेनाद्वारे हॅम रेडिओ हे वायरलेस रेडिओ सिग्नल पाठवू किंवा स्वीकारू शकतात. म्हणूनच हॅम यंत्रणा ही इतर कुठल्याही मोबाईल टॉवर किंवा टेलिफोन वायर्सवर अवलंबून नसते व म्हणूनच या दोन्ही गोष्टी बंद पडल्यावरसुद्धा विनासायास चालू राहते.

हॅम रेडिओचे प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यात हॅम स्वयंसेवक निर्माण करण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून लवकरच करणार आहोत.
- कोमल रोहित भोसले, सचिव, सातारा ॲमॅच्युअर रेडिओ असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT