Support of fodder camp to Animals 
पश्चिम महाराष्ट्र

चारा छावणीचा जनावरांना आधार 

हरिभाऊ दिघे

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुका सहकारी दुध संघाने तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे सुरु केलेल्या चारा छावणीत चारच दिवसात एक हजार 25 जनावरे दाखल करण्यात आली आहेत. दुष्काळी स्थितीत सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरांसाठी आधार ठरली आहे.

संगमनेर दुध संघाने आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ता. 27 मे ला सायंकाळी चारा छावणी सुरु करण्यात आली. त्यासाठी शेड उभारण्यात आले. याठिकाणी एक हजार 25 दुध-दुभती जनावरे दाखल करण्यात आली. याठिकाणी जनावरांसाठी सावली, चारा, पशुखाद्य व पाण्याची सोय करण्यात आली आहे. मोठ्या जनावरास प्रतिदिन 18 किलो ओला उस चारा व एक किलो पशुखाद्य दिले जाते, तर छोट्या जनावरास 9 किलो ओला उस चारा व अर्धा किलो पशुखाद्य दिले जाते. उसाची कुट्टी करून जनावरांना चारा पुरविला जात आहे. चारा व पाणीटंचाई लक्षात घेता या चारा छावणीत मोठ्या संख्येने जनावरे दाखल करण्यात येत आहेत. शेतकरी जनावरांजवळ रात्रंदिवस ठाण मांडून आहेत. दुष्काळी स्थिती गंभीर बनल्याने संगमनेर दुध संघामार्फत सुरु करण्यात आलेली ही चारा छावणी जनावरांना आधार ठरली आहे.

जनावरांना दिलासा -
तळेगाव भागात दुष्काळी स्थिती गंभीर बनलेली आहे. जनावरांच्या चारा पाण्याचे होणारे हाल लक्षात घेता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून दुध संघामार्फत सुरु करण्यात आलेल्या या चारा छावणीमुळे जनावरांना दिलासा मिळत आहे.
- बाबासाहेब कांदळकर 
सरपंच, ग्रामपंचायत, तळेगाव दिघे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, "आम्ही पाहू"

Devendra Fadnavis:...हा तर पोळी भाजण्याचा डाव; दिल्लीतील आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Revenue Department: महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल; चंद्रशेखर बावनकुळे: मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Live Updates Marathi : सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेला तयार

Petrol-Diesel Price Today: अमेरिकेत पेट्रोल महागल्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! मुंबई-पुण्यात काय आहे भाव?

SCROLL FOR NEXT