corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

वशी येथे तीन, मौजे डिग्रजला दोन रूग्ण...शिराळे खुर्द, तिसंगी, पुजारवाडीतही रूग्ण : जिल्ह्यातील रूग्णसंख्या 294 वर 

सकाळवृत्तसेवा

सांगली - जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येचे त्रिशतक जवळ आले असून आज आणखी 8 रूग्ण आढळले. आज वशी (ता. वाळवा) येथे तीन, मौजे डिग्रज (ता. मिरज) मध्ये दोन तर शिराळे खुर्द (ता. शिराळा), तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), पुजारवाडी (ता. आटपाडी) येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला. आजअखेर 294 रूग्ण आढळले आहेत. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत. सर्वाधिक रूग्ण शिराळा तालुक्‍यात 94 आढळले असून त्या खालोखाल वाळवा तालुका 50, आटपाडी 28, कडेगाव 22, खानापूर 19, मिरज 16, पलूस 15, जत 13, तासगाव 13, कवठेमहांकाळ 12 याप्रमाणे दहा तालुक्‍यात रूग्ण आढळले आहेत. तर महापालिका क्षेत्रात 12 रूग्ण आढळले आहेत. 

आज वाळवा तालुक्‍यातील वशी येथे तीन रूग्ण आढळले. त्यामध्ये 49 वर्षाची महिला, 29 वर्षाचा तरूण, 24 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. मौजे डिग्रज येथे 36 वर्षाचा पुरूष आणि 15 वर्षाची मुलगी यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. शिराळे खुर्द येथे 53 वर्षाचा पुरूष, तिसंगी येथे 27 वर्षाचा तरूण, पुजारवाडी येथे 53 वर्षाचा पुरूष यांचा कोरोना अहवाल "पॉझिटीव्ह' आला. आज वशी, शिराळे खुर्द, पुजारवाडी येथे नविन कन्टेनमेंट झोन सुरू करण्यात आले. 

आज साळसिंगे, येलूर येथील एक, विटा येथे दोघे, मणदूर येथील पाचजण कोरोनामुक्त झाले. तर सध्या कदमवाडी, वांगी, अंकले, रिळे, मालगाव येथील एकुण पाच रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेले साळसिंगे, विटा येथे दोघेजणही अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी ही माहिती दिली. 
 

जिल्ह्याची स्थिती- 

  • आजचे नविन रूग्ण-08 
  • उपचार घेणारे रूग्ण- 102 
  • बरे झालेले रूग्ण- 183 
  • आजअखेर मृत- 09 
  • आजअखेर पॉझिटीव्ह रूग्ण- 294 
  • ग्रामीणमधील रूग्ण- 233 
  • शहरी भागातील रूग्ण- 49 
  • महापालिका क्षेत्रातील रूग्ण- 12 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Tension: अमेरिकेचा दबाव, पण भारत ठाम! होर्मुज मिशनसाठी सैन्य पाठवण्यास नकार; नरेंद्र मोदी G7 बैठकीत मांडणार मत

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

Jowar Price Hike : भाकरी महागली... ज्वारी 50 पार; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला प्रतिकिलो 80 रुपयांचा दर

दोन सहकारी अन् मित्राच्या त्रासाला कंटाळून TCS मधील आयटी अभियंत्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT