bhigwan 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षणाच्या माध्यमातून कर्मवीरांनी सामाजिक परिवर्तन घडविले - प्रा. साठे

डॉ. प्रशांत चवरे

भिगवण - महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली. फुले दांमत्यांनी सुरु केलेले शैक्षणिक कार्य खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेटाने पुढे नेले. शहरी भागापुरतीच सिमीत असणारी शिक्षणाची गंगा कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांनी ग्रामीण भागांमध्ये आणुन  खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडविण्याचे काम केले असे प्रतिपादन प्रा. संदीप साठे यांनी केले. 

येथील कला महाविदयालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य भास्कर गटकुळ होते. तर प्रा. पद्ममाकर गाडेकर, प्रा. बाळासाहेब खरात, प्रा. सुरेंद्र शिरसट, प्रा. नवनाथ सावंत, प्रा. निलेश जाधव उपस्थित होते. प्रमुख मान्यवर यांचे हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भास्कर गटकुळ म्हणाले, इंदापुर तालुक्यासारख्या पुनर्वसित भागांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा महाविदयालये उभारुन पिचलेल्या लोकांना बळ देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन कर्मवीर अण्णांनी केले. त्यांचा आदर्श तरुण पिढीने ठेवला पाहिजे. प्रास्ताविक डॉ. प्रशांत चवरे यांनी केले सुत्रसंचालन प्रा. धनाजी मत्रे यांनी केले तर आभार प्रा. शाम सातर्ले यांनी मानले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त कर्मवीरांच्या प्रतिमेचे पुजन व झांज व लेक्षीम पथकांच्या माध्यमातून गावांमधुन कर्मवीर प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. सरपंच लता चोपडे यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. उपसरपंच जयदीप जाधव, शंकरराव गायकवाड, प्रदीप वाकसे, गणेश राक्षे, प्राचार्य अशोक बंदिष्टी उपस्थित होते. ग्रामपंचायत कायार्लय, हायस्कुल रोड व तक्रारवाडी येथे झांज पथकाने प्रात्यक्षिके सादर केली. गिरिष मुनोत यांचे वतीने विदयार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali: ''आपण हास्यजत्रेच्या निवेदिका आहात, परंतु...'', मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या प्राजक्ता माळीला ठाकरे गटाचा टोमणा

Success Story: हवेली तालुक्यातील हर्षद शिंदेंचे एव्हिएशन क्षेत्रात यश; अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश, देशातील केवळ ११ यशस्वी उमेदवारांमध्ये निवड!

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख नारायणगाव केसरीचा मानकरी, विजेत्या पैलवानांना 15 लाखाचा इनाम, भारत केसरी निरु गुज्जरवर एकेरी पट!

Summer Roof Cooling Tips: बाहेर कमी घरातच उन्हाचे चटके बसतायत? मग छताची उष्णता कमी करण्यासाठी फॉलो करा 'हे' स्मार्ट जुगाड

New Scam : मोबाईल वापरताना छोटीशी चूक! अकाऊंट मधले पैसे हळूहळू होतील गायब; पटकन बदलून घ्या एक सेटिंग अन् डायल करा 'हा' नंबर

SCROLL FOR NEXT