पश्चिम महाराष्ट्र

वैराग, उपळेतील जनावरांचे दवाखाने आजारी 

कुलभूषण विभुते

वैराग (जि. सोलापूर) ः बार्शी तालुक्‍यातील वैराग व उपळे (दु.) येथील पशुवैद्यकीय दवाखाने वैद्यकीय अधिकाऱ्यांविना गेल्या सहा महिन्यांपासून आजारी पडले आहेत. त्यामुळे आजारी जनावरांची मोठी हेळसांड होत असून पशुपालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 

या संदर्भात सोमेश्‍वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भंगुरे यांनी रिक्त जागेवर त्वरित नियुक्‍त्या कराव्यात, अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 
बार्शी तालुक्‍यातील वैराग-श्रेणी एक व उपळे (दु.) - एक येथील दवाखान्यात 25 जून 2019 पासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदल्या झाल्याने येथील जागा रिक्त झाल्या आहेत. 

वैराग पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत 11 गावे येतात. त्यात वैराग गाव मोठे व महत्त्वाचे आहे. येथील वैद्यकीय इमारत नव्याने बांधण्यात आली असून लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आली आहे. उपळे (दुमाला) या ठिकाणी तात्पुरत्या नियुक्‍त्यावर कामकाज चालू आहे. दुष्काळ, उपलब्ध नसलेला चारा, दूषित पाणी व वातावरणामुळे दुभती जनावरे आजारी पडून दगावण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, पशुपालक वर्गास खासगी डॉक्‍टरांकडे उपचार करण्यासाठी धावावे लागत आहे. चारा-पाणी टंचाईच्या काळात पशुपालक जगविलेल्या जनावरांना उपचाराविना पशुपालकवर्ग हतबल बनला आहे. 

वैराग व उपळे या दोन्ही पशुवैद्यकीय जागा वर्ग-एकच्या असल्याने शासनाकडून त्यांची नियुक्ती केली जाते. जिल्हा परिषदेला तो अधिकार नाही. त्यामुळे वैराग येथे डॉ. प्रमोद मांजरे व उपळे येथे डॉ. बापू क्षीरसागर यांची तात्पुरती नियुक्ती केलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. 
- शिवाजी कांबळे, बार्शी तालुका पशु वैद्यकीय अधिकारी 
 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Wagholi Crime : दागिने चोरी करणारी आंतरराज्यीय महिला टोळी जेरबंद; मध्यप्रदेश मधील सहा महिलांचा समावेश

SCROLL FOR NEXT