Vijay Aauty said I'm not running away 
पश्चिम महाराष्ट्र

औटी म्हणले.. मी पळत नसतो पण तुम्ही काय गमावलं, ते बघा? 

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः पारनेर-नगर मतदार संघात नवख्या उमेदवाराकडून दारूण पराभव झाल्यानंतर आमदार विजय औटी शांत शांतच होते. शिवसेनेचे सरकार येऊनही त्यांचा वावर कुठेच दिसत नव्हता. परंतु त्यांनी आता विधानसभा आणि विकास कामांबाबत जाहीर भूमिका मांडायला सुरूवात केली आहे. 

अळकुटी (ता.पारनेर) येथील महादेव मंदीर सभामंडपाचे उदघाटन माजी आमदार विजय औटी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते,पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, संतोष येवले, नीलेश खोडदे, ताराचंद गाजरे, सखाराम उचघरे, मधुकर जाधव, नामदेव घोलप उपस्थित होते. 

""विरोधात असतांनाही मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून मतदारसंघाचा चेहरा बदलला. तुम्ही काय गमावले आहे याचा शोध तुम्हीच लावा. काही असले तरी कार्यकर्त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही. विकासकामासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी अजून मैदान सोडलेलं नाही,अशा शब्दांत त्यांनी आश्‍वस्त केलं. 

ठाकरे मुख्यमंत्री याचं समाधान 
औटी म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी समाधानी आहे. मुख्यमंत्री म्हणून ते चांगले काम करीत आहे. सभापती दाते व शेळके यांनी जास्तीत विकासकामे करुन कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे. यावेळी औटी यांनी अनेक मुद्यावर चर्चा करून कार्यकर्त्यांनमध्ये उत्साह निर्माण केला. 

कामं तर करणारच 
दाते म्हणाले, पदाच्या माध्यमातून मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. औटी यांच्या माध्यमातून विकासकामे सुरूच राहतील. माझ्या पदाचा वापर मी जनतेच्या कामासाठीच करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. 
शेळके म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना योग्य ते सहकार्य करत आहोत. विकासकामांच्या माध्यामातून कार्यकर्त्यांना नेहमीच पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बोलले... 
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्‍यात अनेक ठिकाणी औटी यांच्या उपस्थितीत विकासकामांचे उदघाटन व दाते व शेळके यांचा सत्कार झाला. मात्र, औटी यांनी भाषण किंवा निवडणुकीबाबत भाष्य टाळले. अळकुटी येथे मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर औटी यांनी मनोगत व्यक्त करून कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT