rajendra patil acb.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

भिलवडीत 12 हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक 

सतीश तोडकर

भिलवडी (सांगली)- बांधकामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून 12 हजार रूपयाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र दिनकर पाटील( वय 49, रा. दत्तनगर, कापुसखेड ता. वाळवा) याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. लाचखोर पाटील विरूद्‌ध भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी, भिलवडी ग्रामपंचायतीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत मुस्लिम समाज दफनभूमी शेडच्या दुरूस्तीसाठी तक्रारदार यांनी निविदा भरली होती. सदरचे काम त्यांना मिळाले होते. तक्रारदार यांना त्यासाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च आला होता. कामाच्या बिलाचा धनादेश अद्यापपर्यंत तक्रारदार यांना मिळाला नव्हता. ते वारंवार चौकशी करत होते. धनादेश काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पाटील याने तीन टक्के प्रमाणे बारा हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे 10 सप्टेंबर रोजी केली होती. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. तेव्हा पाटील याने धनादेश काढण्यासाठी 12 हजार रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 

लाचेची रक्कम आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडुन बारा हजाराची रक्कम स्विकारताना पाटील याला रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्‌ध भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच सायंकाळी एका पथकाने कापूसखेड येथे पाटील याच्या घराची झडती घेतली. उद्या पाटील याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाडगे, निरिक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, कर्मचारी अविनाश सागर, सोहेल मुल्ला, संजय संकपाळ, भास्कर मोरे, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, सिमा माने, राधिका माने, अजित पाटील, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT