Chandoli Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Chandoli Dam : 'चांदोली धरणातून थेट पाणी आणण्याला विरोध का? मदनभाऊ आज हयात असते, तर त्यांनी..'

मदनभाऊ आज हयात असते, तर त्यांनीही धरणातून पाणी आणण्याची भूमिका घेतली असती.

सकाळ डिजिटल टीम

आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही. वारणा उद्‍भव योजना असो अथवा थेट चांदोली धरणातून पाणी आणणे असो, दोन्हींची तुलना झालीच पाहिजे.

सांगली : आमचा वारणा उद्‍भव योजनेला (Varna Udbhav Yojana) विरोध नाही; मात्र चांदोली धरणातून (Chandoli Dam) थेट पाणी आणणे अधिक फायद्याचे ठरेल, असे आमचे मत आहे. या दोन्ही योजनांचा अभ्यास होऊ द्या. त्यातून जे योग्य होईल, त्यावर निर्णय होईल. मदनभाऊ आज हयात असते, तर त्यांनीही धरणातून पाणी आणण्याची भूमिका घेतली असती, अशी भूमिका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मांडली.

मंचतर्फे आज (ता. २) दुपारी चार वाजता गणेशनगरातील रोटरी सभागृहात चर्चासत्र होणार आहे. जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, जीवन प्राधिकरणाचे एस. के. रांजणे, वास्तुविशाद प्रमोद चौगुले मार्गदर्शक आहेत.

ते म्हणाले, सगळ्याच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. मदनभाऊंएवढी दूरदृष्टी असलेले कार्यकर्ते राहिलेले नाहीत. आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही. वारणा उद्‍भव योजना असो अथवा थेट चांदोली धरणातून पाणी आणणे असो, दोन्हींची तुलना झालीच पाहिजे. नदीकाठावरील व ओढे-नाले बाजूला असणाऱ्या शेतीतून होणारा रासायनिक अधिक खतांचा वापर आणि प्रत्येक गावातून मिसळणारे सांडपाणी याची समस्या नदी परिसरात सर्वत्र सारखीच आहे.

कृष्णा नदी प्रदूषित आहे आणि वारणा नाही, हा जावईशोध कोणाचा? आजच्या घडीला वारणा उद्‍भव योजनाही प्राथमिक अवस्थेत आहे. शासनस्तरावर प्रस्तावही सादर नाही. दोन्ही योजनांचा अभ्यास करा. फायदे-तोटे अभ्यासा. दोन्ही प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर करूया. ज्याला शासन मंजूर देईल, त्याचा स्वीकार करू, असे साखळकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘नेत्यांची नावे घेऊन भावनिक करू नका. चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेबाबत उद्या रोटरी सभागृहात सादरीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत काँग्रेस नेत्या जयश्री पाटील व मदनभाऊ पाटील युवा मंचलाही निमंत्रित केले आहे. अभ्यासाने पुढे जाऊ. योजना पुढच्या पन्नास वर्षांसाठी असेल. हा विषय आरोप-प्रत्यारोपाचा नाही, १० लाख नागरिकांच्या आरोग्याचा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

Latest Marathi News Live Update: मीरा-भाईंदर परिसरातील कचरा आणि मातीचं मिश्रण मुंबईत टाकल्याचा प्रकार

IPL 2026 New Rule: आयपीएलने खेळाडूंसाठी आणला नवा नियम! ज्याचं नाव, त्यालाच परवानगी... नव्या नियमाने फ्रँचायझींमध्ये गोंधळ

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT