karate record.JPG 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत कराटेचा विश्‍वविक्रम

सकाळवृत्तसेवा

सांगली- योगासने, स्केटिंगनंतर येथे आज एक नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित झाला. 833 विद्यार्थ्यांनी एकाचवेळी 12 लाखांवर कराटे ब्लॉक्‍स केले. दोन टप्प्यात झालेला हा विक्रम पूर्ण होताच एकच जल्लोष झाला. रविवारी सकाळी कोवळ्या उन्हाच्या साक्षीने हा विश्‍वविक्रम ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडिअम स्कूलच्या प्रांगणात प्रस्थापित झाला. 


या विश्‍वविक्रम कार्यक्रमाचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते झाले. 
यात सुमारे 833 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पहिल्या दहा मिनिटांत 5 लाख 58 हजार 110 ब्लॉक्‍स केले. दुसऱ्या 10 मिनिटांमध्ये 6 लाख 58 हजार 70 ब्लॉक्‍स केले. 


या विश्‍वविक्रमासाठी निरीक्षक म्हणून सिनियर स्पोर्टस्‌चे प्रतिनिधी सुहास कारेकर यांनी काम पाहिले. प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक सुब्राव मद्रासी, ऍड. प्रमोद भोकरे, राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या जयलीला एम. व्ही, सांगली शिक्षण संस्थेचे सचिव श्री. गोरे, श्रद्धा सर्जिकल अँड ऍक्‍सिडेंट हॉस्पिटलच्या डॉ. दिशा कुलकर्णी, आरजीपी ज्वेलर्सच्या मीरा पेंडुरकर, 
सौ. सुंदरबाई शंकरलाल मालू इंग्लिश मीडिअम स्कूलच्या प्राचार्य शैलजा महाजन, सिटी इंग्लिश मीडिअम स्कूलचे प्राचार्य शीतल कुंभार, इंग्लिश मीडिअम स्कूल माधवनगरच्या प्राचार्या जयंती बंकापुरे, चाटे स्कूल विजयनगरच्या प्राचार्य संध्या बारटक्के, जिनिअस पब्लिक स्कूलच्या प्राचार्या जयश्री कोळी, रजपूत इंग्लिश मीडिअम स्कूलचे प्राचार्य कपिल रजपूत, आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल (सांगली)चे को-ऑडिनेटर दिनेश करणाले, सक्‍सेस अकॅडमीचे संस्थापक संतोष चिवटे उपस्थित होते. 


सहभागी खेळाडूंना जपान शोतोकान कराटे डू कांनिजुकु ऑर्गनायझेशन इंडियाचे अध्यक्ष परमजित सिंग व कांनिजुकु चॅंपियन्स कराटे अकॅडमीचे अध्यक्ष महेश भोकरे, अमित यादव, यासीन झांबरे, सुनील कांबळे, असलम पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. मनीष कुकरेजा, धीरज मुल्या, चिन्मय जोशी, ओम कल्याणकर, दीक्षिता मुल्या, श्रुती सासणे, निनाद जोशी, आदित्य वैद्य, अभिषेक धुमाले, निखिल खत्री, आर्य पेंडुरकर यांचे सहकार्य लाभले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; WTC Points Table मध्येही उलथापालथ; पाहा कोण कोणत्या स्थानी

Murud Crime: मुरुडमध्ये गोमांससदृश मटण विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT