महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

गैरकारभार करत असल्याची काही कागदपत्रे प्रादेशिक संचालकांना सादर करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महावितरणच्या भोसरी विभागातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांची मंगळवारी (ता. ७) भेट घेतली. त्यांच्यापुढे विविध अडचणींचा पाढा यावेळी ठेकेदारांनी वाचला. दरम्यान प्रादेशिक संचालकांनी गंभीरतेने कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.

यावेळी पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्षी, पुणे जिल्हा संनियंत्रण सदस्य संतोष सौंदणकर, असोसिएशनचे सचिव नितीन बोंडे, उपाध्यक्ष मनोज हरपळे, जावेद मुजावर, नटराज बोबडे, संजीव पाटील, प्रदीप पाटील, सुनील पवार, महाजन, महेश शेडके, सूरज बराटे, अजय होनराव, मनोज सुखवानी, दिलीप कदम, बोदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

असोसिएशनच्या सदस्यांनी प्रादेशिक संचालक नाळे यांच्या सोबत भोसरी विभागात कार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभार, उडवाउडवीची उत्तरे, ठेकेदार तसेच ग्राहकांची कामे जाणून बुजून उशिरा करणे. त्यांच्या तक्रारी न सोडवणे या विषयी सविस्तर चर्चा केली. अनेक ठिकाणी नियमांच्या आधारे त्रास द्यायचा नवीन उद्योग भोसरी विभागीय कार्यक्षेत्र आणि अन्यत्र सुरू असल्याचे पुराव्यानिशी निदर्शनास आणून देण्यात आले. याशिवाय वीज कंपनीचे काही कर्मचारी चुकीची कामे आणि गैरकारभार करत असल्याची काही कागदपत्रे प्रादेशिक संचालकांना सादर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT