armaan malik house theft esakal
पिंपरी-चिंचवड

Armaan Kohli: सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या बंगल्यात चोरी करून पसार झालेले दोघे जेरबंद, पोलिसांनी सापळा लावला अन्..

Armaan Kohli’s Bungalow Theft: How It Happened? बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरात चोरी, चोरटे जेरबंद, काय चोरलं ते जाणून घ्या!

CD

लोणावळा, ता. २ : सिने अभिनेता अरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी करणाऱ्या दोघा कामगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.
आकाश गौड (वय २१), संदीप गौड (वय २३, दोघेही रा. उत्तर प्रदेश) अशी चोरट्यांची नावे आहेत. याबाबत अरमान कोहली यांनी लोणावळा पोलिसांत फिर्याद दिली होती.

गेल्या आठवड्यात येथील कोहली इस्टेट बंगलो, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली येथून कोहली यांच्या घरातील लॉकरमधून एक लाख रोकड व बारा तोळ्यांची सोनसाखळी असा ऐवज लंपास झाला होता. यानंतर दोन्ही कामगार आकाश व संदीप हे पसार झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचा संशय होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास सुरू असताना वसई येथे आरोपींचा ठिकाणा लागला. ते उत्तर प्रदेशात पळण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्या दोघांना शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सुहास जगताप मार्गदर्शनाखाली फौजदार अभिजीत सावंत, अनिल केरुरकर, हवालदार राहुल पवार, राज मोमीन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, सागर नामदास, तुषार भोईटे, तुषार भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT