pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

बोगस बिले गोळा करणाऱ्यांपासून सावध रहा

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे वाचकांना आवाहन; टोळी कार्यरत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वृत्तपत्र विक्रेते असल्याचे भासवून वाचकांकडून मासिक बिलांची रक्कम गोळा करणाऱ्यांची एक टोळी गेल्या काही दिवसांपासून शहरात सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्यापासून वाचकांनी सावध राहावे आणि विक्रेत्यांची फसवणूक टाळावी, असे आवाहन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाकडून करण्यात आले आहे.

दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नेहमीचा वृत्तपत्र विक्रेता घरपोच वृत्तपत्र वितरणाचे बिल जमा करून घेण्यासाठी वाचकांच्या घरी नियमित भेट देत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांत फसवणुकीच्या उद्देशाने वृत्तपत्र विक्रेत्याचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून काही व्यक्ती बिलाची रक्कम गोळा करण्यासाठी घरोघरी फिरत आहेत.

त्यांच्याकडून विक्रेत्यांची आणि वाचकांचीही फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कोणीही अनोळखी नवीन व्यक्ती बिल मागण्यासाठी आपल्या घरी आल्यास त्याची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय बिलाची रक्कम देऊ नये. आपल्या नेहमीच्या वृत्तपत्र विक्रेत्यालाच मासिक बिलाची रक्कम द्यावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष विजय पारगे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

वाचकांनी ही काळजी घ्यावी...

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने प्रत्येक विक्रेत्याला संघाचे अधिकृत ओळखपत्र दिले आहे. बिल देताना शंका आल्यास योग्य ती खातरजमा करूनच बिल द्यावे.

आपल्या नेहमीच्या वृत्तपत्र विक्रेत्यालाच बिल द्यावे. बिल घेण्यासाठी अनोळखी व्यक्ती किंवा त्यांचा प्रतिनिधी आल्यास संबंधित वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधूनच बिल द्यावे.

ऑनलाइन बिल देताना वृत्तपत्र विक्रेत्याच्या अधिकृत मोबाईलवरून आलेली लिंक किंवा मोबाईल क्रमांक ग्राह्य धरावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT