Poison Sakal
पिंपरी-चिंचवड

बिल्डरने कामाचे पैसे न दिल्याने ठेकेदाराची विष पिऊन आत्महत्या

बिल्डरने बांधकाकामाचे पैसे न देता फसवणूक केल्याने ठेकेदाराने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - बिल्डरने (Builder) बांधकाकामाचे (Construction) पैसे (Money) न देता फसवणूक (Cheating) केल्याने ठेकेदाराने विषप्राशन (Poision) करून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

राजेश जगदीशप्रकाश अगरवाल, संतोष रामअवतार अगरवाल, राहूल भंडारी, अजित सुभाष गायकवाड, अभिजित गायकवाड, सचिन किल्लेदार, ललित जैन व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रविण पंडीत पाटील असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मेहुणे विनोद भाऊराव पाटील (रा. जळगाव) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या बिल्डरच्या तीन प्रकल्पाच्या ठिकाणी प्रवीण पाटील यांनी ठेकेदारी पद्धतीने काम घेतले होते. या कामाचे त्यांना आरोपींकडून एक कोटी ९४ लाख एक हजार ६१६ रुपये येणे बाकी होते. मात्र, आरोपींनी काम झाल्यानंतरही प्रवीण यांना कामाचे पैसे न देता त्यांची फसवणूक करीत धमकी दिली.

दरम्यान, प्रवीण हे चिंचवड स्टेशन येथील आरोपींच्या कार्यालयासमोर बसून राहिले. तरीही पैसे न मिळाल्याने बुधवारी (ता. २५) सकाळी त्यांनी विष प्राशन केले. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, प्रवीण यांची फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT