Ajit pawar  esakal
पिंपरी-चिंचवड

Chinchwad ByElection: "राहुल कलाटेंच्या बंडखोरीमागं खरा सूत्रधार..."; अजितदादा मात्र निश्चिंत

राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे लढणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Chinchwad ByElection : चिंचवड पोटनिवडणूक तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. यामध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांच्यापुढं आव्हान उभं केलं आहे. पण कलाटेंच्या या बंडखोरीमागं खरा सुत्रधार तिसराच असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "शिवसेनेची बंडखोरी झाली त्यासाठी आदित्य ठाकरे सोमवारी तिथं येणार आहेत. सचिन अहिर यांनी देखील ही थोपवण्यासाठी प्रयत्न केले. पण बंडखोरी होण्यामागं सुत्रधार कोणतरी तिसराच दिसतोय. कारण बंडखोरी झाल्यानंतर मतांची विभागणी होऊन इतर पक्षांना फायदा व्हावा यासाठी कोणीतरी हे केलं असावं"

पण मी तिथं गेल्यावर याची माहिती घेईल. पण कोणी जर हे केलं असेल तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारांना आवाहन करतील की, तिन्ही पक्षांचा मिळून महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे आहेत. त्यांनाच मतदान करावं असं ते सांगतील असा मला ठाम विश्वास आहे.

तुम्हाला जर ऐकायचंच नाही, हे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर असंही राजकारण खेळलं जाऊ शकतं. याबाबत आम्ही मतदारांना जागृत करु, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर विक्रीचा भंडाफोड; २५१ सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT