Covishield and Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत बुधवारी कोव्हिशिल्डचे आणि कोव्हॅक्सिनचे ६५ केंद्रांवर लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लशीचे १२ हजार ५५० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे आठ हजार ५५० व कोव्हॅक्सिन लशीचे चार हजार डोस आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक लशीचे १२ हजार ५५० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे आठ हजार ५५० व कोव्हॅक्सिन लशीचे चार हजार डोस आहेत. ते देण्याची व्यवस्था अनुक्रमे ५७ व आठ अशा ६५ केंद्रावर बुधवारी (ता. २२) केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. स्तज्ञदा माता व गर्भवतींसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

कोव्हॅक्सिन लस ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाचशे डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी दोनशे डोस पहिला व तीनशे डोस दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

गर्भवतींना आठ केंद्रांवर लस

गर्भवती व स्तज्ञदा मातांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर स्कूल जुनी सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी आणि जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT