Father and son died after falling from twelfth floor of building pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून पिता-पुत्राचा मृत्यू

वाकड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथे घडली. आदेश क्रांती तायडे (वय १६), क्रांती भीमराव तायडे (वय ४४, दोघेही, रा. मालपाणी ग्रीन हाऊसिंग सोसायटी, पिंक सिटी रोड, वाकड, मूळ-जळगाव) अशी मृत्यू झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.

क्रांती, त्यांचा मुलगा आदेश, एक मुलगी व आई-वडील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहतात. दरम्यान, आदेश हा अगोदर खाली पडला. त्यानंतर क्रांती हे देखील खाली पडले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना माहीती दिली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

क्रांती उच्चशिक्षित होते. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. यासह आदेशची प्रकृतीही ठीक नसायची. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT