find dog sakal
पिंपरी-चिंचवड

‘माझ्या खुशीला शोधून द्या’, शोधणाऱ्यास ३ हजारांचे बक्षीस

पाळीव कुत्री हरवली; पोलिस घेताहेत शोध

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पाळलेला श्‍वान हा काही दिवसातच घरातला सदस्य बनून जातो. निगडीच्या (nigdi) प्रज्ञा पुजारी त्याला अपवाद नाहीयेत. त्यांची कुत्री आठ दिवसापूर्वी गायब झाली आहे. प्रज्ञा यांनी तातडीने रावेत पोलिस (ravet police) चौकी गाठली आणि तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत लगेच पोलिसांनी या श्‍वानाचा शोध सुरू केला आहे. या कुत्रीला शोधून देणाऱ्यास ३ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

निगडी - रुपीनगर येथे राहणाऱ्या प्रज्ञा ज्ञानेश्‍वर पुजारी आयटी क्षेत्रात नोकरीला आहे. या तरूणीकडे खुशी नावाची भारतीय (गावठी) कुत्री होती. पिल्लू असल्यापासून तिचे पालनपोषण त्यांनी केले आहे. आठ दिवसांपासून निगडी परिसरातून हरवली आहे. ती दीड वर्षाची असून दिसायला सुंदर अन लाघवी होती. ती २० ऑगस्टपासून बेपत्ता झाली आहे. याबाबत त्यांनी रावेत पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.‘‘खुशी माझ्या कुटुंबातील सदस्य असून ती गायब झाल्यापासून मला खूप त्रास होताय, कृपया खुशीला शोधून द्या.’’ अशी भावुक साद घालत तरुणीचे अश्रू अनावर झाले आहेत. या तरुणीला खुशीचा एवढा लळा लागला आहे की, तीला शोधण्यासाठी ही तरुणी वणवण भटकत आहे.

शोधल्यास ३ हजाराचे बक्षीस

निगडीतून आठ दिवसांपासून खुशी नावाची कुत्री हरवली आहे. तिला शोधून देणाऱ्यास ३ हजाराचे बक्षीस प्रज्ञा यांनी जाहीर केले आहे. या कुत्री (खुशी) दिसल्यास ७९७२३००९५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी खुशीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे माणसातले प्राणीप्रेम दिसून येत आहे.

‘‘खुशी माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. नकळत आईच्या हातातून सुटली आणि बेल्ट तोडून पळाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने शोध घेत आहोत. मला तिची खूप काळजी वाटत आहे. पोलिसदेखील खुशीचा शोध घेत आहे.’’

-प्रज्ञा पुजारी, प्राणीप्रेमी, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT