Encroachment Sakal
पिंपरी-चिंचवड

Hinjewadi Encroachment : हिंजवडी लक्ष्मी चौक ते मारुंजी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

बेकायदा अतिक्रमणांची बजबजपुरी माजलेल्या आयटी पार्क हिंजवडीतील लक्ष्मी चौकाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला.

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - बेकायदा अतिक्रमणांची बजबजपुरी माजलेल्या आयटी पार्क हिंजवडीतील लक्ष्मी चौकाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला. शूक्रवारी (ता. २७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लक्ष्मी चौक ते मारुंजी शिंदे वस्ती पर्यंतच्या शेकडो अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत सुमारे साडे सात हजार अतिक्रमणे हटविण्यात आली.

हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असताना हे रस्त्यातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे कोंडीत भर घालत होती. त्यामुळे आयटीयन्ससह सर्वांचाच जीव मेटाकुटीला आला होता यावर सकाळने देखील अनेकदा प्रकाश टाकला होता.

अखेर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंगयांच्यामार्गदर्शनाखाली धकड करावाईला सुरुवात झाली. पाहिल्याच दिवशी रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने, टपऱ्या, बोर्ड, हातगाड्या हटविण्यात आल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस सुनील पिंजन व पिएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

तीन जेसीबी व एक अग्निशामक बंब यांच्या साहायाने ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली त्यासाठी दोन वाहतूक पोलिस अधिकारी, दहा कर्मचारी, हिंजवडी ठाण्याचे चार अधिकारी व दहा कर्मचारी तसेच पीएमआरडीएचे कर्मचारी तैनात होते. ही कारवाई सलग चार दिवस चालणार आहे.

कासारसाई पर्यंत रस्त्याच्या दूतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. सकाळी कारवाईला सुरुवात होताच काही व्यवसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली.

प्रतिक्रिया

लक्ष्मी चौकापासून कासारसाईपर्यंत ही अतिक्रमण हटाव मोहीम पीएमआरडीए राबवित आहे. ही कारवाई सलग चार-पाच दिवस चालणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्किंग करून दिलेल्या हद्दीपर्यंत ही कारवाई होणार आहे. मात्र, पुढे पाट मागे सपाट अशी गत होऊ नये म्हणून पीडब्ल्यूडीने त्यानंतरपुढील कारवाई तात्काळ करावी यासाठीही पाठपुरावा करणार आहोत.

- मोनिका सिंग, उपजिल्हाधिकारी पीएमआरडीए

दिवाळी आधीच पीएमआरडीएकडून जणू दिवाळी

गिफ्ट मिळाल्याचा भास होतोय. खरीच आजची कारवाई बेधडक आणि गरजेची होती. अतिक्रमणांमुळे तासनतास अडकून पडावे लागत. एक किमी अंतरासाठी अर्धा पाऊण तास लागतो. ह्या कारवाईमुळे आमच्या सारख्याना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पीएमआर डी एचे धन्यवाद करताना त्यांनी यात सातत्य ठेवावे एवढीच अपेक्षा.

- मोनिका जोशी (आयटीयन्स)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT