पिंपरी-चिंचवड

Pimpri News : इंद्रायणी नदीला ‘फेस’; उद्योगांसाठी प्रक्रियायुक्त सांडपाणी वापरण्याचे आवाहन

तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीच्या दरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषणचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण, रसायनयुक्त पाण्याचा तवंग आणि बर्फाप्रमाणे फेसाचे आच्छादन नदीवर निर्माण झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीच्या दरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषणचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण, रसायनयुक्त पाण्याचा तवंग आणि बर्फाप्रमाणे फेसाचे आच्छादन नदीवर निर्माण झाले होते. त्याकडे ‘सकाळ’ने प्रशासनाचे लक्ष वेधून लोणावळ्यापासून ते तुळापूरच्या संगमापर्यंतची वस्तुस्थिती वृत्तमालिकेच्या माध्यमातून मांडली होती.

त्याची दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यासह नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतीचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात, पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यावर चर्चा करण्यात आली.

तळवडेपासून निरगुडीपर्यंत (चऱ्होली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) इंद्रायणी नदीचा समावेश पिंपरी-चिंचवड शहरात होतो. केवळ डुडुळगावपासून चोविसावाडीच्या हद्दीपर्यंत साधारण एक किलोमीटरचा भाग आळंदी नगरपालिका हद्दीत आहे. इंद्रायणीचा दक्षिण काठ पिंपरी-चिंचवडमध्ये तर पात्र व उत्तर काठाचा समावेश पीएमआरडीएच्या हद्दीत होतो.

या लगत चाकण, तळेगाव, आंबी, महाळुंगे, निघोजे, कुरुळी, चिंबळी, मरकळ, धोनोरे परिसरातील औद्योगिक कंपन्यांचा व गावांचाही समावेश होतो. तेथील सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जाते. शिवाय, पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांद्वारे पाणी नदीमध्ये मिसळते. त्यामुळे, नदीचे प्रदूषण वाढत आहे. काही कंपन्या रसायनयुक्त सांडपाणीही थेट नदीत सोडत आहेत. त्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधून वस्तुस्थिती मांडली होती.

त्यानंतर, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठक बोलवली होती. त्यास मंडळाचे पुणे कार्यालयाचे विभागीय अधिकारी रवी आंधळे, उपविभागीय अधिकारी मंचक जाधव, सदस्य नितीन गोरे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी केंद्रे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कनिष्ठ अभियंता योगेश आल्हाट, विलास देसले, सोहन निकम, ग्रामीण भागातील माणिक शिंदे, चिन्मय नागपूरकर आदी उपस्थित होते. या बैठकीत सध्या सुरू असलेले प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया, नदी सुशोभीकरण आराखडा याबाबत माहिती देण्यात दिली.

इंद्रायणीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. पिंपरी-चिंचवड महापालिकेची यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या हद्दीतील सर्व एसटीपी व ईटीपी लवकरात लवकर कार्यान्वित करावेत. महापालिका क्षेत्रात तयार होणारे सांडपाणी प्रक्रिया करून औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना पुन्हा वापरता येऊ शकते, त्यादृष्टीने विचार करावा.

- नितीन गोरे, सदस्य, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ

इंद्रायणीसह पवना व मुळा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. त्यासाठी चार-पाच उपाय योजनांचा समावेश आहे. नदीला नाले मिळत आहेत, त्याठिकाणी सांडपाणी प्रक्रिया उभारायचे आहेत. त्यामध्ये नाल्यांतील पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. कुदळवाडी नाल्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. तो लवकरच चालू केला जाणार आहे.

याशिवाय, कंपन्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प विचाराधीन असून, त्याबाबतचे नियोजन झाले आहे. नाल्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्या ठिकाणांहून वा भागातून नदीत सांडपाणी येतंय का? याचा शोध घेतला जात आहे.

- विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT