Moka crime Sakal
पिंपरी-चिंचवड

Moka Crime : एकाच महिन्यात सात टोळीतील ११० गुन्हेगारांवर मोका; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारीत एकाच महिन्यात सात टोळीतील ११० गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारीत एकाच महिन्यात सात टोळीतील ११० गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारीत एकाच महिन्यात सात टोळीतील ११० गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली. पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

आयुक्तालयाच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे रेकॉर्ड अद्ययावत करून त्यांच्याबाबत विविध पोलिस ठाणे व गुन्हे शाखेकडून आढावा घेण्यात आला.

त्यानंतर संबंधित गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते. त्यानंतर विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सात टोळीतील ११० गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तर अक्षय मुकुंद गायकवाड याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

पोलिस ठाणेनिहाय कारवाई झालेले कारवाई

पोलिस ठाणे टोळी

चिंचवड - अनिल तुकाराम मोहिते व इतर १० जण

हिंजवडी -हिरा बहादूर हमाल व इतर ७ जण

चाकण -शुभम सुरेश म्हस्के व इतर १७ जण

निगडी - दत्ता बाबू सूर्यवंशी व इतर ३ जण

चिंचवड - आकाश राजू काळे व इतर ६ जण

पिंपरी- विशाल विष्णू लष्करे व इतर ३० जण

तळेगाव दाभाडे -कुणाल धीरज ठाकूर व इतर २९ जण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT