पिंपरी-चिंचवड

#CoronaVirus : लग्नाचा खर्च टाळून नवदांपत्याने हे केले...

रमेश मोरे

जुनी सांगवी : एरवी लग्नाचा लवाजमा व डामडौल काही औरच असतो. मात्र, लॉकडाउनमुळे लग्नसमारंभाच्या हौसेला बंधने आली आहेत. अनेकांनी लग्न पुढे ढकलली आहेत. तर काहीजण लॉकडाउनमधे सोशल डिस्टन्स पाळत घरीच शुभमंगल उरकत आहेत. 

जुनी सांगवीतील सामाजिक कार्यकर्ते महेश भागवत यांचे चिरंजीव ओंकार भागवत याचा वैष्णवी बापूराव डरांगे हिच्याशी ठरलेला विवाह घरात साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. 
प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन अगदी मोजक्या दहा जणांच्या उपस्थितीत तसेच, सर्वांनी मास्क घालून व सोशल डिस्टंन्सिंग राखत हा विवाह भागवत यांच्या घरी पार पाडला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेष म्हणजे सामाजिक दायित्वाचे भान राखत या विवाहामुळे जो खर्च वाचला, तो मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये, असे एकूण ५० हजार रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्याकडे नवदांपत्याच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल महापौरांनी त्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: डीसीपींनी गुंडाला धो-धो धुतला! कल्याणच्या ‘सिंघम’ची धडक कारवाई; व्हिडीओ व्हायरल

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT