Aditi Katare sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड: आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत निवड

वायुसेना सामाईक परीक्षा चाचणी (एएफसीएटी) चा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत संपूर्ण देशातून २४० जणांची निवड झाली. त्यात आदितीचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी चिंचवड: भारतीय संरक्षण दलाच्या वायुसेनेने नुकताच निकाल जाहीर केला. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आदिती कल्याण कटारे हिची निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शाहूनगर येथे आदिती वास्तव्याला आहे. सध्या ती पुण्यात एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. ऑक्टोबर २०२० रोजी तिने वायुसेना सामाईक परीक्षा चाचणी (एएफसीएटी) दिली होती. त्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत संपूर्ण देशातून २४० जणांची निवड झाली. त्यात आदितीचा समावेश आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण शाहूनगरमधील कमलनयन बजाज शाळेत झाले. पूर्वी शाळेत प्रजासत्ताक किंवा स्‍वातंत्र्यदिनी ध्वजवंदनासाठी निवृत्त कर्नल प्रकाश सुर्वे यायचे. त्यांच्या भाषणाने तिला हा मार्ग सापडला. तेव्हापासून तिने देश सेवेत जायचे स्वप्न पाहिले होते.

बारावीत चांगले गुण घेऊन बीटेक करण्यासाठी व्हीआयटी कॉलेज बिबेवाडीला प्रवेश घेतला. त्यानंतर स्नातक प्रबंधन प्रवेश परीक्षा (ग्रॅज्युएट रिकार्ड एक्झामिनेशन) परीक्षेत चांगले गुण मिळवून अमेरिकेतील चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवेशदेखील मिळवला; पण तिला देश सेवेतच रस असल्याने ही परीक्षा दिली. नोकरी करतानाच तिने भारतीय सेवेतील प्रवेशाच्या परीक्षेसाठी खडतर परिश्रम घेतले आणि ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पाच दिवसांचा अवघड सेवा निवड मंडळ (सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) मुलाखतसुद्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. पाच सप्टेंबरपासून ती हैदराबादमधील प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर एरोनॉटिकल इंजिनिअर ही डिग्री मिळवून उड्डाण अधिकारी (फ्लाइंग ऑफिसर) म्हणून इंडियन एअर फोर्समध्ये सहभागी होऊन देश सेवा करेल, असे आदितीने सांगितले. माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक समीर मासुळकर, विशाल मासुळकर यांनी तिचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT