pimpri crime update demand money police under name of Commissioner of Police for transfer sakal
पिंपरी-चिंचवड

बदलीसाठी पोलिस आयुक्तांच्या नावाखाली पोलिसांकडूनच पैसे उकळण्याचा भामट्याचा डाव

पोलिस आयुक्तालयातून बोलतोय, तुम्हाला कुठे बदली हवी आहे, त्यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पोलिस आयुक्तालयातून पाटील बोलतोय, तुम्हाला कुठे बदली हवी आहे, त्यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी करीत एका भामट्याने पोलिसांकडूनच पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात घडला. शुक्रवारी (ता. २५) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात एक फोन आला. आपण पोलिस आयुक्तालयातून पाटील बोलत असल्याचे सांगत पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक घेतले.

त्यानंतर भामट्याने त्या कर्मचाऱ्यांना फोन सुरु केले. तुमचा येथील कालावधी पूर्ण झाला असून तुमची बदली होणार आहे. तुम्हाला कुठे बदली हवी आहे, तेथे तुम्हाला नियुक्ती मिळेल, मात्र, त्यासाठी आयुक्त साहेबांना पैसे द्यावे लागतील, मला सर्व माहित आहे, मी साहेबांचा माणूस असून तुमचे काम करून देतो, असे भामटा सांगत होता.

दरम्यान, एका महिला हवालदाराने ऑनलाइनद्वारे काही पैसे पाठविले. काही वेळाच्या अंतरातच कर्मचाऱ्यांना फोन येऊ लागल्याने संशय आला. त्यानंतर समोरचा व्यक्ती भामटा असल्याचे समोर आले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना कळविल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT