Rahul Bajaj Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : राहुल बजाज यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसमुदाय

बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन विविध क्षेत्रातील व्यक्ती घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन विविध क्षेत्रातील व्यक्ती घेत आहेत.

पिंपरी - बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन (Funeral) विविध क्षेत्रातील व्यक्ती घेत आहेत. आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीच्या आवारातील मैदानावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य शरद पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सकाळ माध्यम समूहाचे आणि पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, महापालिका पक्षनेते नामदेव ढाके, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर व कामगारांनी अंत्यदर्शन घेतले. बजाज परिवारातील मधूर बजाज, संजीव बजाज, राजीव बजाज आदींचे सांत्वन केले.

राहुल बजाज यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. आकुर्डी येथे रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत बजाज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT